उस्माननगर| येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मारतळा ता.लोहा येथील शिवारात २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळीच्या दरम्यान उस्माननगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी झन्न मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना आरोपीसह जवळपास सात मोटारसायकल व जुगाराचे साहित्यासह असे एकूण ३ ,४९, ११० रू. मालासह मिळून आले. या प्रकरणी अटक करून कलम १२ ( अ ) महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उस्माननगर पोलिसांना मारतळा ता.लोहा येथील हरिराम नारायण उबाळे यांच्या (शेतात ) शिवारात झन्ना मन्न नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची चुणूक लागताच तात्काळ घटनास्थळी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान शेतात जाऊन धाड टाकली असता जुगार खेळणारे इतर लोकांनी पळ काढला. शेतात झन्ना मन्न नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना आढळून आले. यातील आठ आरोपींनी विना परवाना बेकायदेशीरपणे झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगद १४ ,११० रूपये व सात मोटारसायकल किंमत तीन लाख ३५ हजार रुपये च्या आसपास एकूण ३ लाख ४९ हजार ११० रू. चे मालासह मिळून आले.
काहीनी उस्माननगर पोलिसांना पाहून शेतातून पळ काढला . उपस्थित असलेल्या आरोपीस व सात मोटार सायकल सह पैसे आणि जुगाराचे साहित्य उस्माननगर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पो.ना. बालाजी वसंत राठोड यांच्या फिर्यादीवरून गु.र.न.२३/२०२४ कलम १२( अ) महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पो.आ.कंधार , सपोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमदार निळकंठ श्रीमंगले हे तपास करीत आहेत.