हिमायतनगर। दि. 27/02/2024 रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे आज मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज वि.वा शिरवाडकर यांची जयंती आदरणीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शेख शहेनाज प्रमुख पाहुणे प्रा. प्रविण सांवत तसेच गंथपाल राजू बोंबले आयोजक डॉ. लक्ष्मण पवार तसेच प्रा. डॉ धुळे व प्रा. वसुदधरा तोटावार यांनी हुतात्मा जयवंतराव व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. डॉ. शेख शहेनाज यांनी कुसुमाग्रजावरती एक सुंदर अशी कविता मांडली व त्यांच्याविषयी त्यांचे मराठी भाषेविषयी असलेले प्रेम आपुलकी याविषयी विस्तृतपणे माहिती विद्यार्थ्यांना दिली त्याचप्रमाणे प्रा. प्रविण सांवत यांनी मराठी भाषेविषयी आत्मीयता त्याचप्रमाणे कुसुमाग्रजावरती त्यांच्या कविता आपल्याला कशा उपयोगी पडतात याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले .
ग्रंथपाल बोंबले राजू यांनी कुसुमाग्रजावरती त्यांनी लिहिलेले पुस्तके कविता कोणकोणत्या आहेत व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयामध्ये येऊन दररोज किमान एक तास तरी पुस्तक वाचले पाहिजे असा संदेश दिला.व नटसम्राट या नाटका विषयी विद्यार्थ्यांना उदाहरण म्हणून दिले. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन प्रा. वसुंधरा तोटावार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. धुळे सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता शेवटी राष्ट्रगीताने करण्यात आली.