नांदेड,अनिल मादसवार| दलित वस्तीमधील झालेल्या नालीचे कामाचे बिल मिळाल्यानंतर ग्रामसेवक कृष्णा रामदिनेवार यांनी 5 टक्के म्हणजे 25,000/- रूपये त्यांना द्यावे लागतील असे म्हणून तडजोडीअंती 24,000/- रूपये लाच स्वीकारताना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यातील तक्रारदार यांचे मौ. सांगवी भादेव, ता. मुखेड, जि. नांदेड येथील वार्ड क्र. 1 मधील दलित वस्तीमधील सांडपाण्याच्या नालीचे कामासाठी 5,00,000/- रू निधी मंजुर झाला होता. मंजुर झालेल्या निधीमधून तक्रारदार यांनी दलित वस्तीमधील झालेल्या नालीचे कामाचे बिल मिळाल्यानंतर यातील आरोपी ग्रामसेवक कृष्णा रामदिनेवार यांनी 5 टक्के म्हणजे 25,000/- रूपये त्यांना द्यावे लागतील असे म्हणाले. सदरची रक्कम 25,000/- रुपये ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.
आज दि. 26/02/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, आरोपी लोकसेवक ग्रामसेवक कृष्णा रामदिनेवार यांनी पंचासमक्ष 25,000/- रू ची मागणी करून तडजोडीअंती 24,000/- रूपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून लोकसेवक यांनी पंचासमक्ष 24,000/- रू मुखेड-लातुर महामार्गावरील राजेश बार अँड रेस्टाॅरंट, मुखेड, जि. नांदेड येथे लाच स्विकारली. त्यांना ला. प्र. वि., नांदेड पथकाने रंगेहाथ पकडले. आरोपी ग्रामसेवक कृष्णा रामदिनेवार यांना ताब्यात घेण्यात आले असुन, पो.स्टे. मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत.
सदर कार्यवाही डॉ. राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड मोबाईल क्र. 9623999944 ,रमेशकुमार स्वामी अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या मार्गदर्शनखाली पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,नांदेड मोबाईल क्र. ७३५०१९७१९७ यांचे सापळा कारवाई पथक श्री जमीर नाईक, पोलीस निरीक्षक, सपोउपनि श्री गजेंद्र मांजरमकर, पोह/किरण कणसे, पोकाॅ/ईश्वर जाधव, चापोना/प्रकाश मामुलवार ,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांनी केली. या घटनेचा तपास श्री जमीर नाईक, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड हे करीत आहेत.
यानंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजेंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा दुरध्वनी क्रमांक 02462253512 टोल फ्रि क्रं.1064 संपर्क करावा.