जेवली येथे सहा घरांना आग; आगीत सात जनावरांचा होरपळून मृत्यू; शेतीचे साहित्य धान्य व कपडा आगीत स्वाहा
उमरखेड,अरविंद ओझलवार। बंदी भागातील जेवली येथील सहा घरांना आज दुपारी दोन वाजता अचानक आग लागल्याने घराजवळील गोठ्यात बांधून असलेले तेरा जनावरे आगीच्या भक्षस्थानी गेले तसेच शेतीचे साहित्य घरातील धान्य कपडा पूर्ण जळून खाक झाले .घरात कोणतीही व्यक्ती नसल्याने सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही परंतु या आगीमुळे सहा घरातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबाचे व व होत्याचे नव्हते झाले .
तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बंदी भागातील जेवली या गावातील शेतकरी सिन्हा मारुती धोत्रे व शेतमजूर दत्ता सोनुले , सिन्हा फकीरा काळे ,दत्ता धोत्रे ,संतोष धोत्रे , लक्ष्मण धोत्रे या सहा जणांच्या घराला आज दुपारी २ वाजता अचानक आग लागली यामध्ये घराजवळील गोठ्यात बांधून असलेले सिन्हा धोत्रे यांचे सहा गाईचे वासरू तथा तीन बोकड तर दत्ता धोत्रे यांचे दोन बोकड व लक्ष्मण धोत्रे यांचे दोन बोकड तसेच दत्ता सोनुले यांच्या तीन कोंबड्या आगीच्या भक्षस्थानी पडून मृत झाल्या .
घरातील सर्व सदस्य शेतीत काम करण्याकरिता गेले असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग लागल्याचे समजतात गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले तसेच उमरखेड वरून अग्निशमन वाहन गेल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत सहा कुटुंबाचा संसार उध्वस्त झाला होता . याआगीत सिन्हा धोत्रे यांच्या घरातील शेतीचे साहित्य स्प्रिंकलर सट, पियुसी पाईप जळून खाक झाले .
घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे बीड जमदार व शिपाई यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले . या गीत शेतकरी व शेतमजूर यांचे संसार उध्वस्त झाला असून त्यांना शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी केली.