नांदेडराजकिय

उमरखेड विधानसभेत काँग्रेस-शिवसेनेला खिंडार; डझनावर पदाधिकारी भाजपात दाखल

उमरखेड,अरविंद ओझलवार। सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या घडामोडीत उमरखेड विधानसभाही मागे नाही. दि.13 फेब्रुवारी रोजी मुंबईस्थित भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामिण विकास मंत्री गिरीश महाजन ,यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा, आ.नामदेव ससाणे यांचे उपस्थितीत उमरखेड विधानसभेतील महागाव,उमरखेड, येथील काँग्रेस-शिवसेनेतील डझनावर पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश करून दोन्ही पक्षास खिंडार पाडले आहे.

आपण यवतमाळ-पुसद समन्वयक नितीन भुतडा आ ससाणे यांचे कार्येप्रणालीवर विश्वास ठेवत महागाव तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतीचे सरपंच व महागाव काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे माजी सभापती यांनी भाजपात प्रवेश केल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाचे उमरखेड जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अँड.जितेद्र पवार, काँग्रेस पक्षाचे उमरखेड नप चे माजी सभापती शैलेश मुंगे,काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पुसद नगरपालिकेचे माजी सभापती अजय पुरोहित, महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष टेम्भी येथील सरपंच अमोल चिकने, पोहांडुळ सरपंच दिनेश पाटील रावते,करंजी सरपंच तात्याराव वानखेडे,धारमोहा सरपंच विकास जाधव,दहीसावळी सरपंच संतोष कोरके, राजुरा सरपंच गजानन बुडाळ, राहुर सरपंच राजू पाटील कदम, काळी (टेम्भी) येथील सरपंच दिगंबर राजने यांचेसह महिला सरपंच गुंज येथील सरपंचा सौ.पुष्पा कांबळे, शंभर टक्के आदिवासी बहुल असलेले मलकापूर येथील सरपंचा सौ. मनाबाई जगदीश रणमले, वरोडी येथील सरपंचा सौ.गायत्री दत्तराव शिंदे, डोंगरगाव येथील सरपंचा सौ.अर्चना वारकड या 15 सरपंचानी आपापल्या ग्रामपंचायत हद्दीतील भविष्यकालीन विकासात्मक दृष्टिकोन हेरून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

महागाव तालुक्यातील माजी सभापती व तब्बल पंधरा सरपंचांसह सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षानी येन निवडणुकीच्या तोंडी कमळ हाती धरल्याने शिवसेना-काँग्रेस पक्षास मोठे खिंडार पडल्याची चर्चा उमरखेड विधानसभा मतदारसंघात आता रंगू लागली आहे.

चौकट पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाच्या ध्येय धोरण,विचारधारेशी एकरूप झालेल्या नवं पक्ष प्रवेशीतांना पक्षात योग्य तो न्याय व सन्मान दिला जाईल असे प्रतिपादन यवतमाळ-पुसद चे समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!