नवीन नांदेड। राज्याचे माजी मुख्यमंञी तथा नांदेडचे नेते आ. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा व आमदारकीची राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या सोबत कार्य करणारे नांदेड तालुकाध्यक्ष मनोहर पाटील शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना अशोकराव चव्हाण ज्या ठिकाणी जातीस तिथे आम्ही त्याच्या सोबत जाणार असल्याचाी प्रतिक्रिया दिली .
नांदेड जिल्हयाचे पालक तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण ह्यांनी दि १२ रोजी भोकर विधानसभा मतदार संघाच्या सदस्यपदाचा व काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानतर नांदेड काँग्रेस पक्षात चलबिचल वाढली असुन प्रत्येक जण आपल्या परिने मत व्यक्त करत आहे . जे निष्ठावंत आहेत त्यांनी आपण अशोकराव चव्हाण यांच्या सोबत असल्याचे मत व्यक्त केले आहे .
त्यात नांदेड काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोहर पाटील शिंदे यांनी माञ अशोकराव चव्हाण यांच्या बोटाला धरुन राजकारणात प्रवेश केला . त्यांनी मला जिल्हा परिषदेचा सदस्य केले . त्यांनीच माझ्यावर नांदेड तालुक्याध्यक्षाची जबाबदारी दिली . आणि तेच जर या पक्षात नसतील तर आम्ही त्याच्या सोबतच जाणार असल्याची प्रतिक्रिया देत मी चव्हाण साहेबांना भेटण्यासाठी जात असल्याचे सांगितले . अशोकराव चव्हाण जिथे तिथे मनोहर पाटील शिंदे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .