हिमायतनगर शहरातील नगरपंचायत जवळ असलेल्या विहिरीमध्ये पाणी उपलब्ध करुन देऊन नागरिकांची भटकंती थांबवा
हिमायतनगर, असद मौलाना। हिमायतनगर शहरातील नळ योजनेचे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्यामुळे शहरातील अनेक वॉर्डात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, यावर उपाययोजना म्हणून नगरपंचायतीने तात्काळ सार्वजनिक विहिरीत पाणी सोडावे आणि बंद असलेल्या ठिकाणी विंधन विहिरी घेऊन जनतेची तहान भागवावी. अशी मागणी वॉर्ड क्रमांक 8 व 12 मधील नागरिकांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे केली आहे.
नगर पंचायत हिमायतनगर च्या जवळ असलेल्या विहिरीचे पाणी हे शहरातील 50% लोकांना पुरवठा करण्यात येतो. पण सध्या असलेला बोअरचे पाणी कमी झाले असुन, यामुळे जनतेला पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याकरीता जनतेची भटकंती सुरु झाली आहे. याकरीता सदर विहिरीमध्ये पाणी सोडणे आवश्यक आहे. सदर विहिरीमध्ये पाणी लकडोबा मंदिरा जवळ असलेल्या बोअरचे पाणी विहिरीत सोडल्यास पाण्याची समस्या मिटेल.
तसेच नविन बोअर मारुन देणे नसता नविन होत असलेल्या नळ योजनेतुन त्वरीत पाणी पाईप व्दारे डायरेक्ट विहिरीमध्ये सोडल्यास शहरातील 50% भागास पाणी मिळेल. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले असून, या अर्जाचा विचार करुन आपण प्रत्यक्षपाहणी व चौकशी करुन त्वरीत वरील प्रमाणे पाणी उपलब्ध करुन विहिरीत सोडुन पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी वॉर्ड क्रमांक 12 व 8 मधील नागरिकांनी केली आहे. यावेळी डॉ अंकुश देवसरकर, तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, संजय माने, सुभाष शिंदे, योगेश चिलकावार, पंडित ढोणे आदिंसह अनेकांची उपस्थिती होती. पाण्यासाठि नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर दत्तात्रेय काळे, गणेश बोरेवार, बालाजी लिंगमपले, पंजाबराव चव्हाण, राम पंतगे, विलास वानखेडे, संतोष वानखेडे, राहुल डांगे, किरण माने, प्रशांत कदम, जयराम शिंदे, लक्ष्मण हरडपकर, नागेश शिंदे, पंजाब वानखेड, विठ्ठल आरेपल्लू, आदिंसह अनेकांच्या सह्या आहेत.