नादेड| कलावंतांच्या न्याय हक्काकरिता सदैव तत्पर असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी सुप्रसिद्ध तबलावादक संगीतकार सचिन श्याम कांबळे सरसमकर यांची लोककला महोत्सव पोटा बुद्रुक येथे झालेल्या कार्यक्रमात पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार मा.भवरे कामारीकर यांच्या आदेशान्वये ह. भ .प .शिवाजी डोखळे ह .भ .प. नागोराव मेंढेवाड, सुशील भाऊ भवरे, पत्रकार परमेश्वर वालेगावकर, जळबाजी जळपते, नागनाथ वच्छेवाड, केशव माने, अविनाश कदम,.शाहीर बापुराव जमदाडे, रमेश नारलेवाड, शंकर गायकवाड यांनी सचिन कांबळे यांना नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.
सचिन कांबळे यांचे सामाजिक सांस्कृतिक कार्यात मोठे योगदान आहे त्या दृष्टीने त्यांनी कलावंतांच्या एकजुटीकरिता प्रयत्न करावे पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या शाखा गाव तिथे करून कलावंतांचे संघटन मजबूत करावे .कांबळे यांच्या कार्याची दखल घेत आपले कार्य त्यांनी जोमाने वाढवावे.व कलावंतांचे संघटन मजबूत करावे याकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार मा.भवरे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे सचिन कांबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे कलावताकडुन कौतुक होत आहे.