संत नामदेवानी साहित्य आणि कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेला- प्रा.फ.मू .शिंदे
नांदेड| नामदेव हे ‘मराठीतील’पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार,त्यानी ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेला ते आद्य प्रचारक होते असे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यिक कवी प्रा. फ.मू .शिंदे यांनी नांदेडच्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात केले.
नानक साई फाऊंडेशनच्या वतीने तारीख ४ फेब्रुवारी रविवार रोजी नांदेड येथे श्री गुरु ग्रंथ साहिब भवन मधे संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटान संत बाबा बलविंदरसिंघ जी यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे स्वागत अध्यक्ष ऍड विजय भाऊ कोलते,माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे, संमेलन अध्यक्ष प्रा डॉ जगदीश कदम,स्वगताध्यक्ष तथा घुमान चळवळीचे मुख्य प्रवर्तक पंढरीनाथ बोकारे,राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश आवटी (पारनेर),विलास सिंदगीकर,नानक साई चे हरियाणा प्रमुख सरदार तेजिंदरसिंघ मक्कर,पानिपत युद्धात शहिद विरांचे वंशज मराठा जगबीरसिंग पानिपत यांची प्रमुख उपस्थिती होती.
वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले एक थोर संत होत. वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. त्यांच साहित्य श्सर्वरेष्ठ आहे असे फ मू शिंदे यांनी म्हणाले. मराठी माणसाचा लाडका कवी फ.मू शिंदे यांनी आपल्या खास शैलीत सभागृहातला अंतर्मुख केलं. संत नामदेवाच्या गावी माझ्या जन्म होणं हे मी माझं भाग्य समजतो .असं म्हणून सभागृहातल्या श्रोत्याचे मने जिंकून घेतली. पुढे ते म्हणाले ,की संत नामदेवाचा हा गजर ऐकून मला मनोमन आनंद झाला आहे.
संत नामदेवाच्या नावानी हे मराठी साहित्य संमेलन भरतय आणि इतकी श्रोतेमंडळी येतात खरं सांगू नानक – साई फाऊंडेशनच हे मोठं काम आहे. संतानी मनानमाला आणि प्रांताला जोडलं. ख-या अर्थान अभंग लिहले , माणूस अंभग केला !! पुढे आई वरची त्याची लोकप्रिय कविता श्रोत्यांच्या आग्रहाखातर ऐकवली ते आई शब्दाची फोड करताना म्हणाले, आ म्हणजे आत्मा आणि इ म्हणजे ईश्वर हा इतका महत्वाचा शब्द आहे. मराठी काव्यात अनेकांनी आईवर कविता लिहल्या असं सांगून संत जनाबाई संदर्भात पुढे म्हणाले , “डोईचा पदर आला खांद्यावरी,” मला प्रश्न विचारतात आता खांद्यानंतर पदर कुठे जाणार आहे ?असं मिस्कील भाष्य करून ते पुढं म्हणाला ,काही माणसं पदराला सोडतचं नाहीत तरीही माय माऊलीच आपल्याला पदराखाली घेतं असते. खचाखच भरलेल्या सभागृहात फ.मू. भाव खाऊन गेले….
ग्रंथदिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद..
श्री संत नामदेव मराठी साहित्य संमेलनानिमित्त रविवारी सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा पासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,भिखू शिलरत्न,स्वागताध्यक्ष तथा नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे,संतुकराव हंबर्डे,सुभाष बल्लेवार,विनायक पाथरकर,संत नामदेवांच्या भूमिकेत दिगंबर कदम,प्रा गजानन देवकर,कवी बापू दासरी, विष्णु अट्टल, अशोक मामीडवार?शिवा कांबळे,सरदार महेंद्रसिंघ पैदल,सतीश देशमुख तरोडेकर,माधवराव पटणे, चरणसिंग पवार,संतोष पांडगळे,महेश मोरे,राजकुमार चौगुले,अश्विनी चौधरी,विक्रम कदम,तुकाराम कोटुरवार,दिगंबर क्षीरसागर,दिलीप पाटील गणेशपुरकर,
दिलीप ठाकूर,सौ प्रफुल्लाताई बोकारे,दिलीप अनगुरवार,रमेश कोकरे,चंद्रकांत पवार,संगीता भालेराव, जयश्री गिराम,अश्विनी देशमुख,नमृता माने,श्रेयसकुमार बोकारे,गंगाधर पांचाळ,प्रा उत्तमराव बोकारे, डॉ रमेश नारलावार,प्रा रामदास बोकारे,प्रा राजेश मुखेडकर,तानाजी बोकारे,प्रलादराव भालेराव,डॉ शिवाजी शिंदे, पुंडलिक बेलकर,प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे,संजय जगताप,प्रा तुकाराम बोकारे,प्आनंद तेरकर, प्रा.दत्तात्रेय बोकारे,सौ विजया साखरे,धनंजय उमरीकर,नागेश लहुगावे,सचिन शिनगारे,सौ राधिका मराठे, महेश कदम,संजय कदम,महेश माने आदी सहभागी झाले. ग्रंथदिंडीत लेझीम पथक, भजनी मंडळे होती. राजश्री पब्लिक स्कूल,सहयोग एजूकेशन कॅम्प्स,राष्ट्रमाता विद्यालय,महात्मा फुले हाईस्कूल,कुसुमताई विद्यालय,महात्मा कबीर व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभागी होत सामाजिक सलोखा या विषयावर सादर केलेले पथनाट्य लक्षवेधी ठरले.
काही विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषेत होते. संमेलन अध्यक्ष प्रा डॉ जगदीश कदम हे होते.स्वगताध्यक्ष घुमान पंढरीनाथ बोकारे यांच्या पुढाकाराखाली हे संमेलन झाले. दरम्यान संत विचारांची आज आवश्यकता आहे का ? या विषयावर परिसंवाद झाला. कथाकथन,कवीसंमेलन,मान्यवर सहित्यिकांचा संत नामदेव साहित्य पुरस्कार व सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा संत नामदेव लाईफटाइम अवार्ड देउन सन्मान करण्यात आला.