हिमायतनगर। विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर सुप्त कलाकौशल्य विकासाचा ध्यास ठेऊन जीवनाचा आनंद घेतला पाहीजे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडून यावा या दृष्टिकोणातून हिमायतनगर शहरातील राष्ट्राध्यक्ष पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात विद्यार्थ्यांनी अनेक गाण्यावर केलेल्या कलेचे कौतुक मान्यवरांनी केले आहे.
हिमायतनगर शहरातील राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल ने शैक्षणिक गुणवत्तेसह खेळामध्ये भरारी घेतली असुन या शाळेच्या शिक्षकांनी लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन घे भरारी आयोजन केले होते. या स्नेहसंमेलनाचे उदघाटन ह. भ. प. बाळा महाराज, अध्यस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर , प्रमुख पाहुणे महाविरचंद श्रीश्रीमाळ, लताताई पाध्ये, डॉ दामोदर राठोड, संचालक प्रविण जन्नावार, कमलाकर दिक्कतवार, श्याम रायेवार, सुधीर उत्तरवार, प्रमोद तुप्तेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी प्रभु श्रीराम, लक्ष्मण, बजरंगबली च्या झाकीने लक्ष वेधून घेतले होते.
लहान लहान चिमुकल्यांनी अतिशय सुंदर डान्स,कला सादर केली आहे.या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक अर्जुन सोमागारी, उपमुख्याध्यापक कैलास जाधव, संस्कृतीक विभाग प्रमुख अविनाश बोंपीलवार, वंदना पंडित,रेवती सोमागारी, मोहिनी चंदनवार, पुष्पा राठोड, बजरंग गुडेटवार, सविता माने, प्रशांत सूर्यवंशी,अजय जाधव, भाग्यश्री शिंदे, स्वाती अस्तुरे, राहुल अपसनवार, अमोल उमनवाडे, श्वेता बोंपीलवार इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले.