हिमायतनगर। प्रेमसंबंध प्रस्थापित करून इच्छेविरुद्ध लग्न करण्याचा अट्टाहास धरणाऱ्या १७ वर्षीय पोटच्या मुलीची जन्मदात्या आई- वडिलांनी कोयत्याने वार करून हत्या केली. या घटनेनंतर खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या खून प्रकरणातील आरोपींना आज हिमायतनगर येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महोदयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांना तपास करण्यासाठी वेळ मिळणार असून, या घटनेला अंजाम देण्यासाठी इतर कोणी सामील होते का…? या दिशेने तपास होणार आहे.
त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या इच्छेविरुद्ध मुलगी वागत असल्याच्या संतापाने समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने मयत कु.अंकिता हीच शुक्रवारी मध्यरात्री कोयत्याने वार करून निर्घुर्ण खून केला होता. ही घटना १ फेब्रुवारी रोजी घडली असून, खून लपविण्यासाठी खून झाल्यानंतर मुलीला हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल करून मयत अंकिताच्या खुनाला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता असे पोलिसांनी सांगितले. मात्र, यासंदर्भात शंका निर्माण झाल्याने शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मुलीच्या डोक्याला व ठिकठिकाणी गंभीर मारहाण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवशंकर बुरकुले यांनी सांगितले.
यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांना मुलीचा खून केल्याची कबुली दिल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत पंचफुलाबाई रामराव पवार, आणि रामराव पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आणखी कुणाचा हात आहे का..? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान आज खून प्रकरणातील आरोपीं माता – पित्यास हिमायतनगर येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महोदयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांना तपास करण्यासाठी वेळ मिळणार असून, या घटनेला अंजाम देण्यासाठी यात इतर कोणी सामील होते का…? या दिशेने तपास होणार आहे.