नांदेड। आदिवासी कोळी, मणेरवारलू समाजाच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार डॉ.व्यंकटेश काबदे यांनी केले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास आदिवासीं कोळी समन्वय समितीच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा आज सलग चौथा दिवस आहे.शुक्रवारी २ डिसें रोजी सकाळी ओबीसी नेते,माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे एक तास बसून या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
यावेळी राज्य संघटक,आरक्षण हक्क संवर्धन समिती महाराष्ट्र तथा शिव,फुले,शाहू,आंबेडकर विचार चळवळीचे नेते श्याम निलंगेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी अन्नत्याग आंदोलक मारोतराव देगलूरकर,सोपानराव मारकवाड,मानणेरवारलू समाज सुधारक मंडळ अध्यक्ष दत्तात्रय अन्नमवाड या आंदोलकांना पाठींबा डॉ. काबदे यांनी पाठींबा दिला.
आदिवासी कोळी,मणेरवारलू समाजाच्या जात पडताळणीचा विषय सरकार कडून गंभीर केला जात आहे.जाती जातीत दंगली घडवण्याचा घाट रचला जात आहे. त्यास जनतेने बळी पडू नये असे आवाहन भीम योद्धा श्याम निलंगेकर यांनी केले.
आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून, धनगर समाजाचे नेते ऍड प्रशांत कोकणे,दलित सेनेचे प्रदेश संघटक सचिव संजय वाघमारे, बंजारा ब्रिगेडचे राज्य संघटक सुरेश राठोड, रावण साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब डावरे यांच्यासह सर्व स्थरातून आंदोलनास पाठींबा मिळत आहे.