उमरखेड, अरविंद ओझलवार।नयेथील नागपूर तुळजापूर बोरी राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्या खाली दोन बोलोरो पिकप वाहनातून स्फोटक पदार्थांची देवाण-घेवाण करीत असताना ब्लास्टिंग साठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांची वाहने पोलिसांनी दि 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान पकडले .
मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर वरून उमरखेड येथे ब्लास्टिंग वापरण्यात येणारे स्फोटक पदार्थ दोन बोलोरो पिकप मध्ये भर दुपारी राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन क्रमांक अनुक्रमे MH 22 AN 48 51 व MH 29 t 59 25 ही दोन्ही वाहनेताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी सदर वाहनाचा पंचनामा केला असून वाहनाची कागदपत्रे वगैरे तपासणी सुरू होती तसेच सदर स्फोटक पदार्थांची वाहतूक करण्याचा परवाना संबंधिताजवळ आहे काय ? याबाबत कारवाई सुरू करण्यात आली . दरम्यान वृत्त लिही पर्येंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती . पुढील तपास एपीआय निलेश सरदार करीत आहे .
सपोनि निलेश शं. सरदार, आज दि.31 जानेवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन उमरखेड सरकारी जीप ने पो. स्टे. परीसरात पेट्रोलींगवर असतांना गावातील शिवसेना पदाधीकारी श्री. अतुल मैद यांचा दुपारी 02:22 वाजता माझ्या मोबाईल वर फोन आला व त्यांनी फोनद्वारे सांगातले की, उमरखेड बायपास ने बळीराजा रसवंतीच्या जवळ रोडवरील पुलाखाली दोन बोलेरो पिक्अप गाड्या संशयीत स्थितीत उभ्या आहेत. त्यांच्यामध्ये स्फोटके असन्याची शक्यता आहे.
तुम्ही या अशा माहितीवरून मी सोबत परि. पोउपनि सागर इंगळे, पोशि गिते असे सरकारी जीप ने नमुद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन पाढऱ्या रंगाच्या महिंद्रा कंपनी च्या बोलेरो पिकअप गाड्या थांबुन होत्या त्यांचे गाडी क्र.MH22AN4851 आणि MH29T5925 चालकांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपली नावे अब्दुल अबरार शेख व विशाल सिंग जसवंत सिंग रा. ह. मु. उमरखेड असे सांगीतले त्यांना गाडीमध्ये काय आहे असे विचारले असता त्यांनी गाडीचे मागील गेट चे कुलुप उघडुन दाखलविले त्यामध्ये Superpower 90 EXPOLOSIVE BLASTING TYP E स्फोटके असल्याचे सांगीतले.
त्याला वाहतुकीचा परवाणा विचारला असता त्याने मराठवाडा एक्सपॉझीव हाता तालुका शेनगाव जि. हिंगोली येथील बिल व वे बिल दाखविले तसेच मजिशा एन्टरप्रायीजेस डिंडाळा ता. उमरखेड यांनी सदर स्फोटके विकत घेल्याचे सांगीतले. त्यांना पोलीस स्टेशऩ ला घेऊन येऊन दोन पंचासमक्ष त्या स्पोटकांची पाहणी करून तपासणी केली असता त्यामध्ये एकुन 55 बॉक्स Superpower 90 EXPOLOSIVE BLASTING TYP E आणि लाल वायरचे सात बॉक्स मिळुन आले.
गाडीमध्ये एकत्रीत वाहतुकीस प्रतिबंधीत असलेले डिटोनेटर मिळुन आले नाहीत. सदर कागदपत्रांची खरेदी बिल वे बिलाची पडताळणी केली असता प्रथमदर्शनी कुठलेही अनुचीत असा प्रकार दिसुन आला नाही. तरी सदर बाबत विधी अधिकारी यांच्याकडून अधीकचे कार्यदेशीर मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झाल्यास कार्यावाही करण्याची तजवीज ठेवली आहे. तुर्तास सदर वाहने ही मुळ चालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.