नाबार्डच्या माध्यमातून महिला नेतृत्व विकास कार्यक्रम संपन्न
नायगाव, माणिक भिसे। नायगाव तालुक्यातील केदारवडगाव येथे संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, नाबार्ड अर्थसहाय्यातून एकात्मिक पाणलोट विकास व अवक्रमीत मातीचे पुनर्वसन कार्यक्रम प्रगती पथावर असून दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नांदेड च्या माध्यमातून महिला नेतृत्व विकास कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री केदारेश्वर पाणलोट सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाटील जाधव हे होते आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिलीप दमयावर नांदेड जिल्हा विकास व्यवस्थापक व राजेश सुतरावे सामाजिक संस्थेचे साधन व्यक्ती यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना दिलीप दमयावर यांनी महिलांना व्यवसाय,उद्योग याबद्दल व बँकेतून घेतलेल्या कर्जातून उद्योग,मार्केट कसे सध्या करायचे आणि यामधून मिळालेला नफातून पुढील भांडवल तयार करून आपला उद्योग पुढे घेऊन जाणे याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.
स्वयंसहायता गटाच्या निर्मितीचा समाजात तसेच कुटुंबातील महिलांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे त्यांची सामाजिक,आर्थिक स्थिती सुधारते आणि त्यांचा स्वाभिमान देखील वाढतो असे सांगितले. यानंतर कार्यक्रमाला लाभलेले सामाजिक संस्थेचे साधन व्यक्ती म्हणून राजेश सूतरावे यांनी महिलांना बचत गट गटामार्फत पंचसूत्रीचा अवलंब करून महिलेना नेतृत्व करण्यासाठी आहवान केले.स्वयं सहायता गट महिलांना सक्षम बनवतात आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करतात महिला ग्रामसभा आधी निवडणूक मध्ये अधिक सक्रिय सहभाग घेतात याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित पोलीस पाटील म्हणून नागोराव आनंदराव जाधव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच या कार्यक्रमाला गावातील श्री केदारेश्वर पाणलोट सेवाभावी संस्था चे उपाध्यक्ष उद्धव अंबाजी जाधव सदस्य लक्ष्मीबाई दत्तराव जाधव,सगन्यानबाई बालाजी जाधव,अनुसयाबाई शिवराज जाधव,सुमनबाई शेषेराव जाधव,प्रतिष्ठित नागरिक बापूराव व्यंकटी जाधव,नामदेव जेजेराव जाधव, दगडू रघुनाथ जाधव,संभाजी गोविंदराव जाधव,दिगांबर जेजेराव जाधव,आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार गंगामणी आंबे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी तज्ञ विजय भिसे,किशन जाधव,चंद्रकांत बाबळे आदींनी परिश्रम घेतले..