नवीन नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोपाळ चावडी येथे सरपंच गिरिजाबाई डाकोरे यांच्या हस्ते घ्वाजारोहण करण्यात आले, यावेळी गावातील महिला वर्षा कंधारे या तलाठी परिक्षा उत्तीर्ण झाल्याबदल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोपाळ चावडी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच गिरजा बाई डाकोरे यांच्या हस्ते घ्वजाहारोहण करण्यात आले, यावेळी ,ऊपसरपंच साहेबराव पाटील सेलुकर, ग्रामसेवक पि. डी. उबाळे,ग्रामपंचायत सदस्य अशोक अंकुलवार,नितीन कंधारे, रमेश तालीमकर, माजी उपसरपंच मोहन खटके, प्रतिनिधी अनिल धमणे,नवनाथ डाकोरे, ग्रामपंचायत कर्मचारी बोयलवार, आशिर्वाद डाकोरे,शेख शाकीर,अशोक बनसोडे, यांच्या सह गावातील प्रतिष्ठीत नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद शाळा, गोपाळ चावडी, जगदगुरु हपंया स्वामी शाळा गोपाळ चावडी यांनी लेझीम कवायती सादरीकरण केले, उपस्थित विधार्थी यांना खाऊचे वाटप केले.