तेलंगवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
उस्माननगर। येथून जवळच असलेल्या मौजे तेलंगवाडी ता. कंधार येथील ग्रामदैवत श्री मारोती रायाच्या कृपाशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. सद्गुरु श्री .श्री. १००८ महंत स्वामी प्रयाग गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीमद् भागवत कथेचे आयोजन दि. ३१ जानेवारी २०२४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे चार ते सहा काकडा आरती, सात ते दहा श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अकरा ते एक गाथा भजन ,दोन ते पाच श्रीमद् भागवत कथा, ६ ते ७ हरिपाठ ,रात्री ९ वा. हरी कीर्तनाचे व नंतर हरिजागर होईल. भागवताचार्य :- साध्वी अमृतानंद, सरस्वती माताजी अकोळनेर जिल्हा. नगर येथील महाराज भागवत कथा सांगणार आहेत. यावेळी संगीत सिंथ वादक श्री. ह. भ. प. राहुल महाराज नाव्हलगावकर, गायक ह. भ. प. श्रीधर महाराज पांचाळ यांची साथ लाभली आहे.
तेलंगवाडी तालुका कंधार येथील अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दिनांक ३१ जानेवारी रोजी सप्ताहास प्रारंभ होणार असून यावेळी संध्याकाळी किर्तनकार म्हणून श्री. द. भ. प. बालयोगी शामसुंदर गिरी महाराज आष्टीकर , दि. १ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. मैनाताई हिपनाळीस्कर ( देगलूर) , दि. २ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. चंद्रकांत महाराज लाठकर, दि. ३ फेब्रुवारी रोजी स्वररत्न ह. भ. प. माणिक महाराज रेंगे परभणीकर,
दि. ४ फेब्रुवारी रोजी ह भ. प. महंत प्रभाकर महाराज कपाटे बाबा ( भोकर) दि ५ फेब्रुवारी रोजी भागवताचार्य शंकर महाराज लोंढे ( सोनमांजरीकर) दि. ६ फेब्रुवारी रोजी शि. प. भ. वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर, दि ७ फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तनकार म्हणून श्री ह . भ. प. उद्धव महाराज येळेगावकर यांचे कायद्याचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी भागवत कथा व पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी तेलंगवाडी यांनी केले आहे.