हिमायतनगर| तालुक्यातील मौजे बोरगाव ता. येथील वडिलोपार्जित असलेली शेत सर्वे नं.७ मधील जागा नमुना नं.८ अ ला लावून देण्यासाठी तसेच पुनर्बधित शेत सर्वे न.२४ मध्ये ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने निवड केलेली स्मशानभूमीची जागा रद्द करा. या मागणीसाठी कालपासून हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे.
तालुक्यातील मौजे बोरगाव ता. येथील वडिलोपार्जित असलेली शेत सर्वे नं.७ मधील जागा नमुना नं.८ अ ला लावून देण्यासाठी तसेच पुनर्बधित शेत सर्वे न.२४ मध्ये ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने निवड केलेली स्मशानभूमीची जागा रद्द करण्यासाठी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. राजेश्वर हत्तीअंबिरे पालमकर जिल्हाध्यक्ष नांदेड (उत्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पाडुरंग मुनेश्वर, तुकाराम किशन मुनेश्वर यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून, वृत्त लिहीपर्यंत कोणीही अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत आमची मागणी मेनी होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.