लोहा। लोहा तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रावर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शांततेत पार पडल्या.१ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या तर नायब तहसीलदार अशोक मोकले व शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली दोन भरारी पथके नेमण्यात आले होते.
लोहा तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रावर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेण्यात आली तालुक्यातील १ हजार ४८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १ हजार ४०६ विद्यार्थी उपस्थित होते.शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात १४४ पैकी १३३ विद्यार्थी उपस्थित होते.केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक दामोदर वडजे होते. त्यांना संतोष जोशी, बालाजी गवाले, आर आर पारेकर यांनी सहकार्य केले.संत गाडगे महाराज विद्यालयात ४०८ पैकी ३९६ उपस्थित कै.विश्वनाथराव नळगे विद्यालय केंद्रावर ४०८ पैकी ३८४ उपस्थित, नारायण इंग्लिश स्कुल केंद्रावर ४०८ पैकी ३८३ तर जय महाराष्ट्र प्राथमिक शाळेत ११४ पैकी ११०विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा केंद्रावर मुख्याध्यापक डी एस बोधगिरे, विलास नागेश्वर, केंद्र प्रमुख नरेंद्र कसबे , संतोष भालेराव, यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले.
बिईओ सतीश व्यवहारे यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्राची पाहणी केली केंद्र संचालक दामोधर वडजे यांच्या परीक्षा व्यवस्थे बद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे,साधन व्यक्ती एच एस जामकर, चव्हाण, यांच्या भरारी पथकाने पाहणी केली .शिक्षण विस्तार अधिकारी बी जी गुट्टे, केंद्र प्रमुख अशोक आढाव, केंद्र मुख्याध्यापक बाबुराव फसमले, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरसिकर, बालाजी गवाले, संजय अकोले व शिक्षकांनी परीक्षासाठी परिश्रम घेतले.