लावणी महोत्सवात बहारदार सादरीकरण

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| श्रीक्षेत्र माळेगाव येथे शुक्रवार दिनांक 13 जानेवारी रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सलाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध संचानी एकापेक्षा एक अदाकारीने रसिकांची मने जिंकली.
या लावणी महोत्सवात आठ संच दाखल झाले होते. सर्व संचांनी बहारदार सादरीकरण केले. विचार काय हाय तुमचा, पाहुणं विचार काय तुमचा…., ओ शेट लय दिवसानी झाली भेट…, जवा बघतीस तू माझ्याकड तेव्हा खासदार झाल्या सारखं वाटतय…., बाई कसला नवरा पाहिजे तुला, बाई मी लाडाची कैरी पाडाची, कारभारी दमान आदघ लावण्या यावेळी सादर झाल्या. याप्रसंगी सर्व संचाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र व मानधन देऊन गौरव करण्यात आला.
लावणी महोत्सवात वैशाली वाफळेकर चौफुला, अशा-रूपा परभणीकर मोडनिंब, श्यामल स्नेहा लखनगावकर, मोडनिंब, वैशाली परभणीकर, पुणे, तुमच्यासाठी काय पण, शाहीर प्रेमकुमार मस्के संचलित स्वर संगम व अनुराधा नांदेडकर या संचांनी सादर केलेल्या बहारदार लावण्यांनी रसिकांची मने जिकली.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लावणी महोत्सव होतो. यात्रे सारख्या ठिकाणी लावणी महोत्सव घेणारी नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा एकमेव यात्रा आहे. येथे चांगले नियोजन केले आहे. आमचा सन्मानही होतो, असे मत लावणी सम्राज्ञी दीपा रूपा परभणीकर व पूनम कुडाळकर यांनी व्यक्त केले.
