नांदेडसोशल वर्क

रस्ता सुरक्षा अभियानातर्गत हेल्मेट जनजागृती रॅली संपन्न

नांदेड| प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. त्याअनुंषगाने आज प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांमध्ये हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे उद्घाटन सकाळी 8.30 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या हस्ते संपन्न झाले.

या रॅलीत परिवहन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक वाहन वितरक व सामान्य नागरिक इत्यादी सुमारे 200 ते 220 अधिकारी / कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. ही हेल्मेट रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून शहरातील प्रमुख रस्ते व एसपी ऑफीस चौक, कलामंदीर, आयटीआय चौक, श्रीनगर, राज कॉर्नर मार्गे साठे चौक, जुना मोंढा कौठा, लातूर फाटा, सिडको मार्गे एकूण 21 किमीचे अंतर पार करत प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये 35 महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमास या कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत हे उपस्थित होते. शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे व सुभाषचंद्र मारकड हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, मंजूषा भोसले, गणेश तपकीरे व निलेश ठाकूर, संघपाल कदम सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या हेल्मेट रॅलीद्वारे ‘हेल्मेटयुक्त व अपघातमुक्त नांदेड’ असा संदेश नागरिकांना देण्यात आला.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!