नांदेडलाईफस्टाईल

पाणी टंचाईच्या कामात हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्या – आमदार माधवराव पाटील जवळगावकर

हिमायतनगर,अनिल मादसवार| आगामी काळात ग्रामीण भागातील कोणत्याही गावात पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची सर्व ग्रामसवेकांनी काळजी घ्यावी. पाणी टंचाईच्या बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, कोणत्याही समस्या भासल्यास थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.

ते पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेडच्या वतीने शुक्रवार 12 जानेवारी 2024 रोजी वसंतराव नाईक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत उपस्थित अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवकांना संबोधित करताना बोलत होते. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.१२ जानेवारी रोजी हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमधील पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार गायकवाड, गटविकास अधिकारी सुदेश मांजमरकर, तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सतीश हिरप, बांधकाम अभियंता पवार, सरपंच संघाचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, तसेच ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पत्रकार व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचायत समितीच्या वतीने मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड व सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार माधवराव पटेल जवळगावकर यांचे पुष्पहाराणे जंगी स्वागत केले. लगेच हिमायतनगर तालुक्यात पाणीटंचाईबाबत आढावा बैठक सुरू झाली. यावेळी बैठकीत तालुक्यातील अनेक गावातील सिंचन विहिरी, पाणीपुरवठा पाईपलाईन, विंधन विहीर, पाईपलाईन दुरुस्ती, ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणारे रस्ते, पूल व इतर शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीचे निमंत्रण सरपंच व पत्रकारांना देण्यात हलगर्जीपणा केल्याचा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी यापुढे होणाऱ्या बैठकीचे निमंत्र सरपंच व पत्रकारांना पाठवण्याचे निर्देश दिले. तसेच बोरगडी येथील ग्रामसेवक बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे संबंधितास नोटीस पाठविण्याचे निर्देश आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ग्रामसेवक, सरपंच व नागरिकांनी आपापल्या गावातील उन्हाळी पाणीटंचाईची बद्दल माहिती दिली. त्यानुसार अंमलबजावणी करून भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घेयावी. अशी सुचना आमदार माधवराव पटेल जवळगावकर यांनी दिल्या. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!