हिमायतनगर, परमेश्वर काळे| देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा परिधान करून जयंती कार्यक्रमात सामील झाल्या. एव्हडेच नाहीतर तर शहरातून प्रभात फेरी काढली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या संस्काह शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी महिलांना शिक्षकांचे हक्क मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची आणि योगदानाची गाथा सांगण्यात आली.
शिक्षण मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु अनेक समाज यापासून फार पूर्वीपासून दूर आहेत. शिक्षेचा हक्क मिळवण्यासाठी त्यांना दीर्घ लढा द्यावा लागतो. विशेषत: मुलींना शिक्षा मिळण्यासाठी त्यांच्या पालकांचा विरोध सहन करावा लागतो. त्या सर्वाना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढली. सावित्रीबाई फुले यांच्याशिवाय देशाची शिक्षण आणि सामाजिक उन्नती अपूर्ण आहे. सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत मुलींसाठी १८ शाळा उघडल्या. आज त्यांच्यामुळे समाजातील महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, हे केवळ शिक्षणामुळेच शक्य झाले अशी माहिती यावेळी देऊन विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सुभाष शिंदे, परमेश्वर वानखेडे, रामराव सूर्यवंशी, दिगंबर काळे, मायंबा होळकर, गणेश दळवी, आदींसह अनेक मान्यवर, महिला – पुरुष पालक, शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच माली समाज बांधवांच्या वतीने महात्मा फुले चुकत सावित्रीबाई फुले याना बहिवदन करून या ठिकाणी खिचडीचे वितरण करण्यात आले यावेळी. यावेळी परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, पोलीस निरीक्षक भुसनूर, नगराध्यक्ष कुणाल राठोड, डॉ.राजेंद्र वानखेडे, गजानन चायल, विठ्ठल ठाकरे, सुरेश गडपाळे, सदाशिव काळे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.