नांदेड| नक्षली हल्यात शहीद झालेले आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या जन्म दिनानिमत्त विरपत्नी सुधा शिंदे व गुरु जी फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील विर पत्नींचा सन्मान करण्यात आला.
शहरातील नागेश कल्याणकर कोचिंग क्लास या ठिकाणी आज दि. 01 जानेवारी रोजी या कार्यक्रमात आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट प्रमिल उपाध्यक्ष, प्र्रा. नागेश कल्याणकर, सहाय्यक निरीक्षक प्रशांत कुंडे, हवालदार सरन्नाप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहीद सुधाकर शिंदे प्रतिमेला अभिवादन करण्यात आलेे. आयटीबीपी बलाच्यावतीने वतीने विरपत्नी सुधा शिंदे यांच्या सन्मान करण्यात आला. त्यानंतर जिल्हातील शहीद जवानांच्या पत्नी रेखा हणमंते, संगिता वाघमारे, शितल कदम, श्रीमती सिद्धपूरे, विरपिता बालाजी केंद्र यांचा शाल, सन्मानचिन्ह व रोपटे देवून सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात आजी-माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी सैनिक सुनिल लोणे, जनार्दन शेजुळे, राजाराम पांजगळे, रामराव कौशल्ये, बालाजी सांगावेकरे, बालाजी नावंदे, आंबादास कांबळे, मनोहर कदम, आनंद राठोड, डि. बी. लंगोटे, सुधाकर घोडके, शिवाजी गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सुनिल पारडे, निवृत्त आरोग्य साहय्यक अर्जुन भोसले, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गौतम कांबळे, गुरु जी फाऊंडेशनचे यशपाल भोसले, सुरेश काशिदे, अश्वजित कांबळे, अविनाश भोसले, सुनिल पारडे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.