नांदेड| शहरातील इंद्रायणी बिजनेस पार्क , डी.मार्ट ,काॅनाल रोड नरसिंह सिटी येथे ह.भ.प. भाऊसाहेब महाराज देशमुख पावडेवाडीकर प्रतिष्ठाण आयोजित कै.सौ. सुलोचनाबाई भाऊसाहेब देशमुख पावडेवाडीकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय ग्रामिण स्वाभिमानी तुकाई महिला पुरस्कार 2023 चा सौ. विमलताई माळी रा.अनगर ता.मोहळ,जि. सोलापूर यांना प्राचार्य डाॅ.सर्जेराव शिंदे, प्रमुख अतिथी प्राचार्य डाॅ. अविनाश सरनाईक ,ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, डाॅ. बी.बी. पावडे , यांच्या हस्ते शाल ,पुष्पहार, स्मृतीचिन्ह, मानपञ देवून करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर डाॅ.सुर्यप्रकाश जाधव,सेवानिवृत प्राचार्य सु.ग.चव्हाण, ह.भ.प. निळोबा महाराज हरबळकर, सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, आदीसह उपस्थित होते.
या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. सर्जेराव शिंदे होते, प्रमुख अतिथी प्राचार्य डाॅ. अविनाश सरनाईक, पावडेवाडीच्या सरपंच सौ.वर्षाताई बुख्तरे, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज देशमुख, डाॅ.बी.बी.पावडे, डाॅ. सुर्यप्रकाश जाधव, ह.ब.प. निळोबा महाराज हरबाळकर व राज्यस्तरीय ग्रामिण पुरस्काराच्या मानकरी सौ.विमलताई सिद्धराम माळी होत्या. मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन माऊली ज्ञानेश्वर महाराज, व कै. सौ. सुलोचना भाऊसाहेब देशमुख, यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. मान्यवराचा सत्कार प्रा.संदिप पावडे, व्यंकटराव पावडे, आदीने केला. तर राज्यपुरस्कार प्राप्त सौ.विमलताई माळी यांचा सत्कार साडीचोळी, शाल पुष्पहार ,मानधन देवून सौ.सौ.सुनिता डाॅ.बी.बी. पावडे यांनी केला.
प्रस्ताविक डाॅ.बी.बी. पावडे यांनी पुरस्काराचा हेतू स्पष्ट करतांना म्हणाले समाजाचे काही देणे आहे, आई कोरोणात गेल्याने तिची सेवा करण्याची संधी मिळाली नाही, आई स्मृती जागवून कै. सुलोचनाबाई आई व भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर बाबाचा वसा पुढे चालविण्यासाठी या राज्यस्तरीय ग्रामिण महिला पुरस्कार असून हा तिसरा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्य सोलापूर जिल्ह्यातील ग्रामिण साहित्यातून समाज प्रबोधन करुन लोकशिक्षण देणार्या परिवर्तनशिल आधूनिक बहिणाबाई चौधरी कवयञी सौ.विमलताई सिद्धराम माळी यांना दिला जातो आहे.उच्चविद्याविभूषितला लाजविल अशी आलौकीक काव्यरचना त्यांची आहे. त्यांची डिग्री शेतातील खूरपे आहे. त्यांना ऐकल्यानंतर आपण अचबित व्हाल असे डाॅ.बी.बी. पावडे यांनी सांगीतले.
सौ. विमलताई माळी यांना दिलेल्या मानपञाचे वाचन डाॅ. सुर्यप्रकाश जाधव यांनी केले या प्रसंगी मनोगत प्रमुख अतिथी प्राचार्य डाॅ. अविनाश सरनाईक यांनी व्यक्त केले. ग्रामिण महिला राज्य पुरस्कार प्राप्त महिला सौ.विमलताई माळी म्हणाल्या ,” मी दुसरी पास असून मला निसर्गाचे बालपणा पासूनच वेड आहे.अनुभवाच्या शाळेत शेती खुरपत 800 कविता लिहिल्या आहेत. काव्य करण्याचे मला वेड आहे. त्यामुळे मी अखिल भारतीय साहित्य संम्मेलन पिंपरी चिंचवेड येथे बळेच सहभाग नोंदवून तेथे जमलेल्या लोकांनी जे सहानुभूती व कौतूक केले. त्यामुळे मला प्रेरणा मिळालीअसे त्यांनी सांगीतले. वडिलाचे नेहमीच मला पाठबळ मिळाले, त्यामुळे मी कविता लिहीत गेले. संत ज्ञानेश्वर महाराज, मुंग्याचा मोर्चा, दुःखाची कविता, अशा अनेक कविता कवयिञी विमलताई माळी यांनी सादर करुन श्रोत्यांना,उपस्थितांना अचबिंत करुन थक्क केले. कोणतीही डिग्री न घेतलेल्या विमलताईने उच्चशिक्षितांना आश्चर्यचकीत केले.
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ. सर्जेराव शिंदे म्हणाले, आम्ही कागदाच्या जंगलात वावरत असून आमचे ज्ञान या माऊली पुढे फिके आहे. उपजत काव्याची आवड असणार्या व आलौकीक काव्य करण्याची क्षमता विमलताई माळी यांच्या शब्दात ताकद असून सामान्याच्या मनातील भावना व्यक्त करण्याची जादू त्यांनी साधली आहे. त्या विद्यापिठातील विद्यार्थ्याना ऐकविण्याची आवश्यकता आहे. त्यांचे साहित्य हे अभ्यासक्रमात आले पाहिजे. अतिशय उत्कृष्ठ कवयिञीची निवड या राज्यपुरस्कासाठी डाॅ.बी.बी. पावडे यांनी केली ती वाखानण्यासारखी आहे. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. या कार्यक्रमाचे सुरेख सुञसंचलन सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक अनगुलवार यांनी केले तर अभार विश्वजित ऊर्फ पवन देशमुख पावडेवाडीकर यांनी मानले .त्यानंतर ह.भ.प. निळोबा महाराज हरबाळकर यांचे र्हदयस्पर्शी किर्तन झाले. उपस्थितांना पावडे परिवाराच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली होती. अभार कार्यक्रमाचे संयोजक डाॅ.बी.बी.पावडे यांनी मानले.
नांदेड ह भ प भाऊसाहेब महाराज पावडे वाडीकर प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी सौ सुलोचनाबाई भाऊसाहेब देशमुख पावडे वाडीकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय ग्रामीण स्वाभिमानी तुकाई महिला पुरस्कार मोहोळ जिल्हा सोलापूर येथील सौ विमलताई सिद्धाराम माळी यांना प्रदान करताना ह भ प ाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर सर्जेराव शिंदे प्राचार्य अविनाश सरदेसाई पावडेवाडी चे सरपंच वर्षा दीपक बुक्तरे संयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बाबुराव पावडे ह भ प निळोबा महाराज विठ्ठलराव देशमुख डॉक्टर सूर्यप्रकाश जाधव सौ सुनीता बाबुराव पावडे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सेवानिवृत मुख्याध्यापक अशोक अनगुलवार आदी उपस्थित होते.