कोकण/विदर्भ/खान्देश | नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ३१ मार्च २४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली विदर्भ,खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता ३१ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे.
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते.गुढीपाडवा व होळीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी ३१ डिसेंबर २३पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३१ मार्च २०२४पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर जंक्शन येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी ०३ वाजुन ०५ मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगाव गोवाला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५.४५ वाजता पोहोचेल.मडगाव (गोवा) ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव गोवा येथून रात्री ० ८.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.४५ वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.मडगाव (गोवा) ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव (गोवा) येथून रात्री ०८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.४५ वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.
नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव बडनेरा जं, अकोला जं,शेगांव,मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम(गोवा), तसेच करमाळी (गोवा) या स्थानकांवर थांबणार आहे. तीन महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ५२ फेऱ्या होणार आहेत. तसेच या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण www.inquiry.indianrail.gov.in,www.irctc.gov.in व भारतीय रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर सुरू २२ डिसेंबर २३ पासुन करण्यात आले आहे.
नागपूर मडगाव गोवा प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे समिती सदस्य व सल्लागार ॲड पुरुषोत्तम डांगरा,प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.शबनम शेख,माधुरी शर्मा,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर,दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर,मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी,प्रवासी सुधिर राठोड,दिपक सोनवणे,सुधिर राठोड,विदर्भ खान्देश विद्यार्थी-विद्यार्थीनी प्राध्यापक प्राचार्य शिक्षक-शिक्षिका आदिनी केले आहेत.