नवीन नांदेड। श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत दंत जयंती उत्सव निमित्ताने सिडको परिसरातील स्वामी समर्थ सेवा क्रेंद रामनगर येथे २० ते २७ डिसेंबर २३ रोजी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आयोजन केले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री प.पु.मोरे दादा , श्री प.पु.गुरु माऊली, यांच्या कृपाशीर्वादाने दि. २० ते २७ डिसेंबर दरम्यान दैनंदिन सकाळी ७.३० वा,औदुंबर प्रदक्षिणा सकाळी ८.०० वा,सकाळी ८.१५ वा, नित्यस्वाहाकार सकाळी ८.३० ते १०.३० सामुहिक गुरुचरित्र वाचन सकाळी १०.३० वा. नैवेद्य आरती सकाळी १०.४५ वा.विशेष याग दुपारी १२.०० वा.विशेष सेवा व पारायण दुपारी ४ ते ६ वा. विशेष सेवा व पारायण सायं. ६.०० वा.औदुंबर प्रदक्षिणा सायं. ६.३० वा. नैवेद्य आरती सायं. ७.०० वा. विविध विषयांवर मार्गदर्शन सायं. ७.१० वा.श्री विष्णुसहस्त्रनाम, गिताई व मनाचे श्लोक वाचन १९डिसेबंर २३ मंगळवार ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी व पूर्व तयारी २० डिसेंबर२३ बुधवार मंडल स्थापना,

अग्नि स्थापना,स्थापित देवता हवन व नित्यस्वाहाकार २१-१२-२०२३ गुरुवार नित्यस्वाहाकार, गणेश याग / मनोबोध याग २२ डिसेंबर २३ शुक्रवार नित्यस्वाहाकार, गिताई याग ,२३ रोजी शनिवार नित्यस्वाहाकार, स्वामी याग २४ डिसेंबर २३ रविवार नित्यस्वाहाकार, विष्णू याग (स. ७ वा.) चंडी याग ,२५ डिसेंबर २३सोमवार नित्यस्वाहाकार, रुद्र याग / मल्हारी याग २६ डिसेंबर रोजी २३मंगळवार नित्यस्वाहाकार, बली पूर्णाहुती, दु. १२.३९ वा. श्रीदत्त जन्मोत्सव २७ बुधवार रोजी श्री सत्यदत्त पुजन, देवता विसर्जन व सप्ताह सांगता,सकाळी १०.३० वाजता महानैवेद्य आरती मांदियाळी व महाप्रसाद होणार असून या सप्ताह मध्ये जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

