क्राईम

सार्वजनिक शौचालय रिपेअरिंग कंत्राटाचे एम बी बुक मंजुर करून देण्यासाठी १ लक्ष ८० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या चौघांविरुद्ध कार्यवाही

अमरावती/यवतमाळ| नगरपरीषद सार्वजनिक शौचालय रिपेअरिंग कंत्राटाचे ८,००,०००/-रूपयेचे बिलाचे एम बी बुक मंजुर केल्याचा मोबदला म्हणुन 1,80,000 रुपायाच्या लाचेची मागणी करून घटनास्थळ कमांक १ आझाद मैदान यवतमाळ आणि घटनास्थळ कमांक २, बांधकाम विभाग नगर परीषद यवतमाळ कार्यालय येथे स्वीकारणाऱ्या चौघांविरुद्ध लाचलुचपात प्रातिबंधक विभागाने सापाला रचून कार्यवाही केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सवसितर वृत्त असे कि, यवतमाळ येथील एका 47 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी निखिल प्रताप पुराणिक वय ३३ वर्ष पद-स्थापत्य अभियंता, वर्ग-०३ बांधकाम विभाग,नगरपरीषद यतवतमाळ रा.सहकार नगर, रेणुका अर्पाटमेट, दुसरा माळा यवतमाळ, शेख साजीद शेख वाजिर वय ३५ वर्ष पद-कनिष्ठ लिपीक वर्ग-०३ बांधकाम विभाग, नगर परीषद यतवतमाळ रा. सव्वालाखे लेआऊट बोसा वैष्णवी किराण दुकानजवळ यवतमाळ, शताक्षी सुरेश उभाळकर (कांबळे) वय २७ वर्ष पद-उदयान पर्यवेक्षक, वर्ग-०३ बांधकाम विभाग, नगर परीषद यतवतमाळ रा. सुवर्ण नगर, वाघापुर घर नं ०३ यवतमाळ, सतिश विठठलराव जिवणे वय ५२ वर्ष पद-शासकिय ठेकेदार बांधकाम विभाग, नगर परीषद यतवतमाळ रा. आंबेडकर चौक पाटीपुरा यवतमाळ *( खाजगी इसम) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली आहे.

यातील तक्रारदार यांनी दिनांक २१/११/२०२३ रोजी लाचलुचपात प्रतिबंधक विभागाला दिलेल्या तकारीनुसार तसेच दिनांक २२/११/२०२३ रोजी झालेल्या पडताळणी कमांक-१ व दिनाक १४/१२/२०२३ रोजी झालेल्या पडताळणी क्रमांक-२ व सापळा कारवाई दरम्यान आरोपी कमांक १ यांनी तक्रारदार यांचे नगरपरीषद सार्वजनिक शौचालय रिपेअरिंग कंत्राटाचे ८,००,०००/-रूपये चे बिलाचे एम बी बुक मंजुर केल्याचा मोबदला म्हणुन लाचखोर आरोपी कमांक १ यांनी पडताळणी कारवाई दरम्यान तडजोडीअंती १,६०,०००रू मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले.

तसेच आरोपी कमांक २ आणि ३ यांनी तक्रारदार यांनी आतापर्यंत यवतमाळ नगरपरिषद येथे केलेल्या वेगवेगळ्या कामाचे वर्कीग हॅन्ड अॅन्ड डन / कामपुर्तता प्रमाणपत्र देण्याकरीता पडताळणी कारवाई दरम्यान तडजोडीअंती २०,०००रू मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केल्याने व आयोजित सापळा कारवाई दरम्यान लाचखोर आरोपी कमांक १ यांचे वतिने आरोपी कमांक ४ यांनी पंचासमक्ष लाच रक्कम १,६०,०००रु स्विकारल्याने तसेच आरोपी कमांक २ यांनी स्वतः व आरोपी कमांक ३ यांचे करीता लाच रक्कम २०,००० रु पंचासमक्ष स्विकारल्यावरुन त्याचे विरूध्द पो स्टे यवतमाळ शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कार्यवाही मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. 1)श्री.देवीदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती. 2)श्री मिलिंदकुमार बहाकार , पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती, सापळा व तपास अधिकारी पो. नि. केतन मांजरे ला.प्र.विभाग,अमरवती यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकाचे केतन मांजरे,पोलीस निरीक्षक,अमरावती, पो.नि.चित्रा मेसरे, अमरावती, पो. कॉ.आशिष जांभोळे,पो. कॉ. वैभव जायले, पोउपनि सतिश किटूकले, चालक यांनी सक्षम अधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परीषद यवतमाळ यांनी केली आहे.

या कार्यवाहीनंतर अमरावती , यवतमाळ भागातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा – लाच लुचपत प्रतिबंधक, अमरावती, अमरावती पोलीस उप अधीक्षक @दुरध्वनी क्रं – 0721-2552355 @टोल फ्रि क्रं 1064

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!