श्री खंडोबादेव भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन
नांदेड| श्री खंडोबादेव पालखी कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन दि.18 डिसेंबर 2023 रोजी श्री रामदूत हनुमान मंदिर सिध्दनाथपुरी, भोईगल्ली नांदेड येथे करण्यात आले आहे. हा भव्य पालखी मिरवणूक सोहळा दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे.
श्री रामदूत हनुमान मंदिर सिध्दनाथपुरी, भोईगल्ली येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.18 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता भव्य पालखी मिरवणुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पालखी सोहळा येळकोट-येळकोट जय मल्हारच्या जयघोषात, खोबर-भंडार्याच्या उधळनीत उत्साहात पार पडणार आहे. दरवर्षी हा पालखी सोहळा अनेक भक्तांच्या उपस्थितीत पार पडतो.
या पालखी सोहळ्यात श्री खंडोबादेव यांची पालखी मिरवणुक काढण्यात येते व नंतर पालखी परत मंदिरात येवून तेथे श्री खंडोबादेव यांची आरती झाल्यानंतर भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. या पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालखी मिरवणूक सोहळा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.