श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ… पिंपळगाव येथेअखंड दत्त नाम चातुर्मास समाप्ती व दत्त जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहाचे आयोजन
वडगाव/पोटा, पांडुरंग मिराशे। शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ पिंपळगाव येथे अखंड दत्त नाम चातुर्मास समाप्ती व दत्त जन्म उत्सव निमित्ताने तपस्वी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते दिनांक २०डिसेंबर २०२३ रोज बुधवार पासून सप्ताहास प्रारंभ होत असून २७ डिसेंबर रोज बुधवारी २०२३ काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ते ५ काकडा ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण दुपारी ४ ते ५ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी 5 ते ६ माऊलीचा हरिपाठ रात्री ८ ते १० हरीकीर्तन होणार आहे.
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवक्तेह.भ.प. लक्ष्मण महाराज बोरगडीकर व ज्ञानेश्वरी प्रवचन प्रवक्ते ह.भ. प. माधव महाराज बोरगडीकर यांच्या अमृतमय वाणीतून ऐकावयास मिळणार आहे. दिनांक २० डिसेंबर रोज बुधवार ह भ प पंजाबराव महाराज सालगणी कर यांचे रात्री किर्तन होईल दिनांक २१ डिसेंबर रोज गुरुवार ह भ प प्रभाकर बाबा कपाटे महाराज भोकर यांची रात्री हरिकीर्तन दिनांक २२डिसेंबर शुक्रवार ह भ प सुरेश महाराज पोफाळीकर यांचे रात्री हरिकीर्तन होईल. दिनांक २३ डिसेंबर रोज शनिवार ह भ प शिवाजी महाराज वटंबे आळंदीकर यांचे रात्री हरी कीर्तन होईल. दिनांक२४ डिसेंबर रोज रविवार ह भ प भीमराव महाराज सूर्यवंशी फुटानकर यांचे रात्री हरी किर्तन होईल दिनांक २५ डिसेंबर रोज सोमवार ह भ प विश्वनाथ महाराज काकांडीकर यांचे रात्री हरिकीर्तन होईल.
दिनांक २६ डिसेंबर रोज मंगळवार ह भ प भास्कर महाराज कामारीकर यांचे रात्री हरी कीर्तन होईल .दिनांक २७ डिसेंबर रोज बुधवार सकाळी ९/३० ते ११/३० या वेळेत ह भ प माधव महाराज बोरगडीकर यांचे काल्याचे किर्तन होऊन नंतर महाप्रसाद होईल परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री तपस्वी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ पिंपळगाव यांनी केले आहे.
सप्ताहातील गुणी भजनी मंडळ साहेबराव शनेवार व त्यांचे सहकारी बोरगडीकर, परमपूज्य श्री गंगेश्वर महाराज मदनापुरकर यांच्या शुभहस्ते दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे तरी परिसरातील भावी भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.