घुंगराळा येथील खंडोबा यात्रेची जय्यत तयारी सुरू, यात्रेसाठी भाविक भक्त,व ग्रामपंचायत प्रशासन सज्ज – वसंत सुगावे पाटील
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारी प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घुंगराळा येथील खंडोबा देवस्थानची यात्रा दरवर्षी मोठया प्रमाणात भरते हि यात्रा नांदेड जिल्ह्यातील मोठ्या यात्रांमधील क्रमांक दोनची यात्रा असून घुंगराळा येथे यंदाही ही यात्रा दिं.18 डिसेंबर रोजी सुरू होणार असून या यात्रेच्या नियोजनासाठी घुंगराळा ग्रामपंचायत, व भाविक भक्त तयारीला लागले असून यंदाची ही यात्रा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस तथा गावचे प्रभारी सरपंच वसंत सुगावे पाटील यांनी दिली आहे.
या यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये साफसफाई, रस्ते,नाली दुरुस्ती ही कामे करण्यात येत असून त्याबरोबरच वीज पुरवठा यात्राकाळात खंडित होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीकडून सर्व कामे करण्यात येत आहेत. पाण्याच्या व्यस्थापनाबद्दलही ग्रामपंचायत कार्यालयातर्फे पाणीपुरवठा सुरळीत राहण्याकरिता पाणी पुरवठ्याच्या कामाचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच मंदिर परिसरात साफसफाई, व रंगरंगोटी चे काम करण्यात येत आहे ही सर्व कामे ग्रामपंचायत चे प्रभारी सरपंच वसंत सुगावे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक श्री.शिंदे व ग्रामपंचायत चे कर्माचारी करत आहेत. तसेच यात्रा समितीतर्फे यात्रेकरीता लोकवर्गणी गोळा करणे चालू आहे. यंदाची ही यात्रा धुमधडाक्यात व उत्साहात होईल अशी आशा वसंत सुगावे पाटील व गावकरी, यात्रा समिती यांनी व्यक्त केली आहे.