नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव हे तालुक्याचे ठिकाण असूनही बस स्थानक येथे प्रवास्यासाठी साधा प्रवासी निवाराही नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात लहान थोर शालेय विद्यार्थी वृध्द या प्रवासासाठी तात्काळ प्रवासी निवारा उभारण्यासाठी भाजपाचे नायगाव शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून विविध राजकीय पक्षासह सामाजिक कार्यकर्त्यांची ही नायगाव येथे बस स्थानक व्हावे अशी मागणी होती परंतु आजवर तरी बस स्थानक झालेले नाही पण साधा प्रवास्यासाठी प्रवासी निवारा देखील नाही दररोज हजारो प्रवासी यात शालेय विद्यार्थी लहान थोर आणि वृद्ध प्रवास्यासाठी निवारा देखील उपलब्ध नाही. बस स्थानकच्या दोन्ही बाजूला पत्राचा प्रवासी निवारा उभारण्यात आलेला होता त्यातील एक प्रवासी निवारा चोरीला गेलेला आहे तो कसा कधी कुठे गेलेला आहे यावर अजून तरी कुठलीच कारवाई झालेली नाही उन्हाळ्याचे दिवस सुरुवात झालेले आहे.
प्रवासी उन्हाचे चटके सहन करीत असताना त्यांना प्रवासी निवारा होणे गरजेचे आहे गाडी येईपर्यंत विसावा घेण्यासाठी प्रवासी निवारा तात्काळ उभारण्यात यावा म्हणून भारतीय जनता पार्टीचे नायगाव शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण यासह ओमकार पांचाळ गजानन चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय कडे तक्रारी निवेदन दिले आहेत.जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून प्रवासी निवारा होण्यासाठी गरजेचे आहे,प्रवाशांची गैरसोय थांबवावी अशी ही मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.