हिमायतनगर,परमेश्वर काळे| सामाजिक एकजुटीने सर्व समाज बांधवांनी मिळून महापुरुषांची जयंती विविध समाज हिताचे उपक्रम घेऊन साजरी करावी असे आवाहन मन्नेरवारलू समाजाचे राज्य अध्यक्ष तथा माजी संचालक कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सुरेशराव अंबुलगेकर यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथे आयोजित भगवान बिरसा मुंडा जयंती पंढरवाड्यानिमित्त उत्साहात साजरी करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
सिरंजनी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे दि.धरती आबा, क्रांतिसूर्य, भगवान बिरसा मुंडा यांची 148 वी जयंती भव्य दिव्य साजरी करण्यात आली २४ शुक्रवारी मोट्या आनंदात साजरी करण्यात आली. या कार्येक्रमाचे अध्यक्ष गावातील मन्नेरवारलू समाजाचे प्रतिष्ठित जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव उपलवाड होते. प्रमुख मार्गदर्शक समाजाचे राज्य अध्यक्ष तथा माजी संचालक कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सुरेशराव अंबुलगेकर यांनी सामाजिक एकजुटीने सर्व समाज बांधवांनी मिळून महापुरुषांची जयंती विविध समाज हिताचे उपक्रम घेऊन साजरी करावी. समाजाला येणाऱ्या विविध अडचणी आम्ही सोडवू असे सांगितले.
तसेच उपस्थित समाज बांधवांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय बाबुराव पुजरवाड, जिल्हा परिषद माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव बास्टेवाड, समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अन्नमवार , उपाध्यक्ष वकील राऊतवाड, सदस्य सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी माधवराव आडबलवाड, सामाजिक कार्यकर्ते गजानन मुत्तलवाड, दिपक बास्टेवाड, कन्हैया शिरशेवाड, सिरंजनी येथील सरपंच मेगाताई करेवाड, भा.ज.पा.शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, भा.ज.पा. उपाध्यक्ष बालाजीराव मंडलवाड, सरसम समाज अध्यक्ष अभिमन्यू वडनपवाड, कैलास पोगुलवाड पोलिस पाटील, गणेश निर्मलवाड, माजी सरपंच सुभाष शिलेवाड, गजानन आडबलवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुंकरवाड, हनुमान उपलवाड, अविनाश अंचेटवाड ग्रा.सदस्य, दयाकर सुदेवाड, संजय पुपलवाड, नागनाथ सुदेवाड, रामकिशन भाटे,विजय भाटे, दत्ता उपलवाड, गजानन सुदेवाड, नागनाथ भाटे, गजानन कलेवाड, हनुमान कलेवाड, हनुमान कोंडरवाड, आडेलू सुंकरवाड, जनार्दन सुदेवाड तसेच इतर समाज बांधव भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन व मार्गदर्शन राज्य सदस्य/ विभागीय अध्यक्ष आदिवासी विकास विभाग अमरावती, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम आडबलवाड सरसमकर यांनी केले. प्रास्ताविक व आभार संघटनेचे सचिव प्रल्हाद भाटे यांनी मानले. तदनंतर गाव जेवन व मिरवणूक आयोजित केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.