नांदेड। मराठा आरक्षण मिळावं म्हणुन विवीध आंदोलनात सहभागी झालेल्या शाहूनगर, हडको भागातील 30 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रात्रीला उजेडात आली असून, साईनाथ व्यंकटी टरके वय 30 वर्ष असे मयत युवकाचं नाव आहे.
नांदेड जिल्ह्यातील किवळा ता. लोहा येथील मूळचा राहणारा असून, हल्ली मुक्काम बिजली हनुमान मंदिर समोर, शाहू नगर, हडको नविन नांदेड येथे आहे. मयत युवक हा मराठा आरक्षण लढ्यात अनेक वर्षा पासुन सक्रिय सहभाग होणारा असून, सण 2018 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालया समोर झालेल्या ठिय्या आंदोलनात रात्रंदिवस काम करणारा युवक होता. बेरोजगार असल्याने नेहमी तो ही बाब साईनाथ व्यंकटी टरके वय 30 वर्ष हा आपल्या मित्रांना सांगायचा. चळवळीत एवढा सक्रिय असणारा आमचा साईनाथ एवढं टोकाचं पाऊल उचलेल असं कदापी वाटलं नाही. अशी प्रतिक्रिया मराठा सेवक श्री वडजे यांनी व्यक्त केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, चुक केली मित्रा…. तोंडाला आलेला घास… तो आता खाण्यासाठी तु या जगात नाहीस… 24 डिसेंबर पर्यंत नक्कीच आपल्याला आरक्षण मिळणार भावांनो एवढी टोकाची भुमिका घेऊन आपलं जिवन संपवू नका, समाजाचा एक सेवक म्हणुन आपणास हात जोडून कळकळीची विनंती करतो. असे आवाहन श्री वडजे यांनी सकल मराठा समाजातील युवा पिढीला केले आहे.