नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल हे गाव आणि येथील प्रशासनाच्या पुढाकाराने होणारा महोत्सव. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. प्रशासनातील काही विकृत मंडळींनी हे मीच केले असा अविर्भाव आणून, वाटल ते बदल करत असल्यामुळे जनतेत तीव्रनापसंधी पसरली आहे. याबाबत आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी प्रशासनाने वेळेत चूक सुधारावी अशी सूचना केली आहे.
महाराष्ट्रातील वेरूळ अजंठा यानंतर होट्टल येथे महोत्सव साजरा होतो. याबाबत तत्कालीन आमदार सुभाष साबणे आणि माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी आपापल्यापरीने विशेष प्रयत्न केले होते. अंतापुरकर यांच्या प्रयत्नाला अशोकराव चव्हाण यांनी प्रतिसाद दिला होता. सार्वजनिक हितासाठी पुढाकार म्हणून आपल्या कुवत क्षमतेप्रमाणे प्रयत्न केले होते. तत्कालीन संवेदनशील जिल्हाधिकारी श्री सुरेश डोंगरे यांनी बिलोली आणि देगलूर येथील अनेकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या होट्टल बाबत सकारात्मक अहवाल तयार करून होट्टल महोत्सव सुरू केले होते. सीमावर्ती भागातील प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनीही याबाबत पाठपुरावा केलेला होता.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल हे गाव आणि येथील प्रशासनाच्या पुढाकाराने होणारा महोत्सव. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. प्रशासनातील काही विकृत मंडळींनी हे मीच केले असा अविर्भाव आणून नवीन आलेल्या कार्यप्रवण जिल्हाधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून वाटल ते बदल करत असल्यामुळे जनतेत तीव्रनापसंधी पसरली आहे. चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधीबाबत गैरसमज पसरून मी आणि मी सांगितलेले निर्णय हे योग्य ! अशा कान गोष्टी करून प्रशासनाबाबत रोष वाढवत आहेत. अशी खरपूस टीका होट्टल येथील ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी व्यक्त केली. यापूर्वी त्या कर्मचाऱ्याबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते.
याबाबत आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी प्रशासनाने वेळेत चूक सुधारावी अशी सूचना केली आहे. जनतेतील संताप लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ ग्रामस्थ व नागरिकांचा राग आता श्रद्धेचा भाग बनत चालला आहे. अनेकांच्या श्रद्धा ढासळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील शुक्राचार्यांना आवरा अशी भूमिका देगलूर पाठोपाठ बिलोलीतूनही व्यक्त होऊ लागली आहे.