
मुंबई| लखनऊ येथे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव व महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांच्या उपस्थितीत ॲड रेवण भोसले यांचा समाजवादी पार्टी प्रवेश झाला.
त्यावेळी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार ,अल्पसंख्यांक ,बेरोजगार तरुण ,महिला इत्यादी प्रश्नावर सतत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्राच्या प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते पदी निवड केली तसेच ॲड भोसले यांना महाराष्ट्रात मोकळेपणाने काम करण्याची तसेच संघटन वाढवण्याची मोठी संधी दिलेली आहे.
त्यामुळे येत्या काळात राज्यातील सर्व प्रश्नांवर समाजवादी पार्टीच्या वतीने मोर्चे ,आंदोलन व शेतकऱ्यांचे प्रश्न वेशीवर टाकण्याचे काम करण्याचे ठरले आहे. ॲड भोसले यांनी जनता जनता दलामध्ये गेल्या 35 वर्षापासून काम करून विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे येत्या काळात समाजवादी पार्टीचे मोठ्या प्रमाणात संघटन वाढविण्याचे मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
