हिमायतनगर| तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची उर्वरित कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून विभागीय संघटक संजय कोडगे, माजी मंत्री सूर्यकांता ताई पाटील, खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, डॉ.प्रसाद डोंगरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडी केल्याची माहिती तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी दिली आहे.
जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी केलेल्या शिफारशीनुसार विविध पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. यात भाजपा शहर अध्यक्षपदी विपुल दंडेवाड, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी लक्ष्मण डांगे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी कल्याण ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दुर्गेश मंडोजवार, महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी सौ. लत्ताबाई मुरलीधर रुघे, ओ.बी.सी. मोर्चा तालुकाध्यक्ष पदी रामेश्वर बब्रुवाहन गड्डमवार, अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्षपदी हिदायत खान इस्माईल खान, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून विकास विक्रम कळकेकर, आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष परमेश्वर माधवराव ढोलें, तालुका सरचिटनीस म्हणून खंडू महादू चव्हाण, तालुका सरचिटनीस रुपेश आनंदराव भुसावळे,
बालाजी तुकाराम मंडलवाड यांची उपाध्यक्ष सरसम बु., ज्ञानेश्वर गणेशराव माने यांची उपाध्यक्ष पारवा, शिवाजी दत्तराव कदम यांची उपाध्यक्ष विरसनी, लक्ष्मण शंकर ढाणके यांची उपाध्यक्ष कारला (पी.), सौ. मनिषा तुकाराम शिंदे यांची उपाध्यक्ष वडगांव, सौ.तुकाबाई माधव वानोळे उपाध्यक्ष दरेसरसम, माधव बालासाहेब सावंत चिटनीस पोटा बु., मनिराम सयाजी वरशेटवार चिटनीस धानोरा ज., सौ. मनिषा बालाजी तोटेवाड चिटनीस हिमायतनगर, सौ. सुनंदा दत्ता शिराने चिटनीस सरसम बु., तानाजी सदरशिव सोळंके चिटनीस खडकी बा., लखन सुरेशलाल जयस्वाल चिटनीस शिबदरा ज.,परमेश्वर अशोक नागेवाड कोषाध्यक्ष हिमायतनगर अशा प्रकरि पदाधिकारी यांची निवडी करण्यात आली आहे.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या पक्षवाढीचे काम अधिक मजबूत करण्यासाठी व तळागाळातील जनतेपर्यंत भाजपाच्या विकासात्मक धोरणानाची माहिती पोचविनाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडी तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे मताधिक्य मिळून देण्यासाठी पक्षसंघटन वाढविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व निवडी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.