कलंबर ( बु. ) येथे श्री. संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि भव्य रक्तदान शिबीर

उस्माननगर,माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर बुद्रुक ता.लोहा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिमवंत वैराग्य पिठाधिश्वर श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु भिमाशंकर महास्वामीजी शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात दि.९ नोव्हेंबर २०२३ ते १६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी१५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
सप्त्यातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ५ काकडा भजन ,६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण ,९ ते ११ गाथा भजन ,१२ ते ४ महिला भजन ,५ ते ६ ज्ञानेश्वरीवर प्रवचन व हरिपाठ आणि रात्री ९ वा हरिकिर्तन व हरिजागर ,आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून धार्मिक व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.या यात्रेला अनन्य साधारण महत्व आहे.या दिवशी श्री.संत अगडंमबुवा महाराज यांच्या दर्शनासाठी हाजारो भक्तांची गर्दी होत असते.
अखंड हरिनाम सप्ताह्यातील किर्तनकार व प्रवचनकार म्हणून दि.९ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी . प्रवचनकार म्हणून शि.भ.प. शिवराज महाराज कलंबरकर तर रात्रीला किर्तनकार म्हणून ह.भ.प. वैराग्य मूर्ती कागदे बापू महाराज वसमतकर ,१० नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सकाळी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. दत्तराम पाटील सोरगे तर रात्री ला किर्तनकार म्हणून ह.भ.प. विलास महाराज येजगे बोथीकर ,, दि.११ नोव्हेंबर रोजी शनिवारी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. गुरू गयबी नागेंद्र महाराज भारती पानभोसीकर ,तर रात्री ला किर्तनकार म्हणून ह.भ.प. पंढरीनाथ महाराज पळसगावकर , दि. १२ नोव्हे.रविवारी रोजी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. बाबुराव उमाजीराव गोरे कलंबरकर तर रात्रीला किर्तनकार म्हणून ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर ,दि. १३ रोजी सोमवारी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. दत्तराज पाटील ताटे पोखरभोसीकर तर किर्तनकार म्हणून ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इसादकर ,दि.१४ नोव्हे. मंगळवारी रोजी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. माधव पाटील घोरबांड लाठखुर्द ,तर रात्री ला किर्तनकार म्हणून ह.भ.प. भगवान महाराज सेद्रेकर,दि.१५ नोव्हेंबर बुधवारी रोजी किर्तनकार म्हणून ह.भ.प. दशरथ महाराज आंबारे चारठाणकर ,दि.१६ नोव्हेंबर रोजी गुरुवारी कारल्याचे किर्तनकार म्हणून ह.भ.प. रोहिदास महाराज मस्के यांचे होणार आहे.
१५ नोव्हेंबर रोजी बुधवारी सायंकाळी ७ वा .अग्नीपुजा करून अग्नी प्रज्वलित करण्यात येणार आहे. व रात्रभर संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि.१६ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी लवकर
पालखीचे गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक निघणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतल भाविक भक्तांनी श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास व यात्रेतील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी कलंबर (बु) यांनी केले आहे.
कलंबर बुद्रुक ता.लोहा येथील श्री . संत अगडंमबुवा यात्रा सर्व दुर परिचित असून ही यात्रा दरवर्षी दिवाळीच्या सणाला भरत असते.दरवर्षाप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी ज्यास्तीत जास्त गरजू रक्तदात्यानी रक्तदान शिबीरात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
