नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची बैठक वादळी ठरली..!

नांदेड| नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितिच्या वतिने लवकरच वर्ष 2024-2025 मध्ये होऊ घातलेल्या मराठवाडा प्रादेशिक विभाग व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई (फेस्काॅम) च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर नुक्तीच एक व्यापक बैठक घेण्यात आली. येत्या जून पासून त्या निवडणूका लागणार आहेत.ही बैठक नांदेडचे ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबादचे तथा मराठवाडा विभाग उत्तर (फेस्काॅम)चे संस्थापक अध्यक्ष मा.सुभाषरावजी बार्हाळे यांच्या अध्यक्षते खाली तथा मा.सर्व श्री रा.नि. देशमुख, डाॅ.हंसराज वैद्य, सौ.निर्मला ताई बार्हाळे, डाॅ.सौ.ज्योती ताई डोईफोडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वा.से. स्व.डाॅ.दादारावजी वैद्य(आर्य) वैद्य रूग्णालय परिसर वजिराबाद येथे पार पडली.
नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच महिला पुरूष ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधीकार्यांनी बैठकीस ऊपस्थिती लावली. प्रामुख्याने या बैठकीत मा.सर्व श्री.रामचंद्र कोटलवार,गिरिष बार्हाळे, प्रभाकर कुंटूरकर, राम पवार किनवट ,माधवराव पवार काटकळंबेकर,सोनुले,मिर्झा मुनीर बेग, देशमुख, मारूती महाराज, धोंडिबाराव शिंदे धानोरा ता.हदगाव,उत्तमराव शिंदे, उत्तमराव जोशी,लक्षमनराव कदम, शामराव पाटील,श्रीमती प्रभा चौधरी,वनिता विकासच्या श्रीमती ज्योतीताई चाटोरिकर अदि अनेक दिग्गज ज्येष्ठ नागरिक संघ नेते उपस्थित होते. मराठवाडा उत्तर विभाग (फेस्काॅम)च्या सध्या कार्यरत निस्क्रीय कार्यकारणीच्या असंविधानिक, फेस्काॅमच्या ध्येय धारणासी विसंगत तथा गल्थान कारभारावर उपस्थित नेत्यांनी सडकून टिका केली.
निमंत्रण देऊनही त्यांच्या अनुपस्थितीवरही एकूनच अश्चर्य व्यक्त करण्यात आले.अनेक विषयावर गरमागरम तथा वादळी चर्चा झाली. कुणालाहि विश्वासात न घेता एकाध्या निष्क्रिय अयोग्य व्यक्तीचे नाव पुढेकरून असंवैधानिक रित्या त्यास सर्वांची सम्मती असल्याचे भासवत,सांगत फिरणें व त्याची अध्यक्ष पदासारख्या महत्वाच्या पदावर वर्णी लावण्याचा पोरकट प्रकार हा निंदनीय प्रकार असल्याचे व वायागेलेल्या सहा वर्षाच्या मराठवाडा उत्तर विभागाच्या चारही जिल्ह्यातील शून्य कामगीरीचीच पुनरावृत्ती होत असल्याने असे कदापी होता कामानये असे अनेक वक्त्यांनी मत व्यक्त केले. भावि कार्यकारणीत काम करू ईच्छीणार्या कार्क्षम तथा योग्य व्यक्तीचीच निवड करण्यात यावी.कुणी म्हणतो म्हणून त्या व्यक्तीची वर्णी लावता कामानये असा सूर बैठकीत उमटला.ईच्छुकांनी समितीकडे अर्ज सादर करावित तथा पदासाठी अर्ज भरावित असे ठरले.
एक त्रिसदस्यीय निवड समिती गठीत करावी असे ठरले. अध्यक्षिय समारोहात मा.सुभाष रावजी बार्हाळे यानीं सांगीतले की मागील साहा वर्षाच्या काळातील कार्यरत कार्यकारणीच्या एकूणच फेस्काॅच्या ध्येय धोरणासी विसंगत तथा विरोधी कार्य पद्धती बद्दल,अकर्तुत्वा बद्धल,निराश जनक कार्य कर्तुत्वा बद्धल प्रचंड नाराजी आणि असंतोष व्यक्त केला.केवळ प्रशासनातील अधिकार्या बरोबर फोटो घेणें आणि प्रशिद्धी माध्यमास प्रसिद्धीस देणें तेही फक्त नांदेड शहरा पुरतेच!बाकीच्या चार जिल्ह्यातही काहीही केले नाही.ना बैठकी,ना चर्चा,ना कार्य शाळा,ना कुठला आढावा,ना कुठले सर्व सामान्य ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य.बैठकीत आता येणार्या कार्यकारणीत तरी ज्येष्ठांनी, ज्येष्ठांतून,ज्येष्ठांसाठी कार्यकरणारी तथा फेस्काॅमच्या सामाजिक, न्यायीक,अर्थिक तथा सर्व समावेशक ध्येय धोरणांशी सुसंगत कार्य करणारी कार्य कारणी निवडली जावी असे ठणकावले!.शेवटी सचिवानींं उपस्थितांचे अभार मानले.
