नांदेडलाईफस्टाईल

नांदेडमध्ये ५ वे ग्रीन कॉरीडॉर; ५ जणांना जीवनदान; निधनानंतर कुटुंबाचा मोठा निर्णय

नांदेड। रविवारी नांदेडमध्ये ५ वे ग्रीन कॉरिडोर करण्यात आले. ब्रेन डेड झालेल्या एका ७३ वर्षीय व्यक्तीचे अवयव म्हणजे एक लिव्हर, एक किडनी हे छत्रपती संभाजीनगर आणि दूसरी किडनी नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये तर दोन डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात येणार आहे. सूर्यकांत‎‎ ज्ञानेश्वर साधू वय ७२ वर्ष यांच्या ‎अवयवांमुळे ५ जणांना फायदा झाला आहे. डॉक्टर असलेल्या मुलाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे तिघांना जीवनदान आणि दोघांना दृष्टी मिळणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वजीराबाद भागातील रहिवासी सूर्यकांत साधू वय ७२ वर्ष हे चक्कर येऊन पडल्याने ते मागील चार दिवसांपासून अत्यवस्थ होते. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबियांनी त्यांना शुक्रवारी ग्लोबल हॉस्पीटलमध्ये दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा ब्रेन डेडमुळे मृत्यू झाला. डॉक्टर असलेला त्यांचा मुलगा डॉ. दिपक साधू यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. कुटुंबियांतील इतर सदस्यांनी देखील अवयव दानाला समर्थक दिले. या निर्णयानंतर रुग्णालयाने ग्रीन कॉरिडोर करण्याची तयारी सुरु केली.  छत्रपती संभाजीनगर येथील कमल नयन बजाज आणि एमजीएम रुग्णालयातील डॉक्टराची टीम रविवारी सकाळी नांदेडला दाखल झाली.

२०१८ नंतर नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडोर ‎करण्यात आले. या वेळी दोन‎ॲब्युलन्स, वाहतूक शाखेसह ‎शिवाजीनगर, विमानतळ, भाग्यनगर‎पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक,‎ उपविभागीय पोलिस अधिकारी व‎अन्य पोलिस कर्मचारी असा एकूण‎ २५ ते ३० जणांचा बंदोबस्त ग्लोबल‎ हॉस्पिटल ते विमानतळ या मार्गावर‎ १२ ते १५ ठिकाणी लावण्यात आला‎ होता. कॉरिडोर पूर्ण होईपर्यंत ५‎ मिनिटे या मार्गावरील वाहतूक बंद‎ करण्यात आली होती.‎

एक लिव्हर कमल नयन बजाज हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तर एक किडनी एमजीएम रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी विमानाने नेण्यात आले. तसेच दोन डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणि एक किडनी प्रत्यारोपणासाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आली. ग्लोबल रुग्णालय ते विमानतळपर्यंतचा अंतर हे पाच किलो मिटरचा आहे. पाच किलोमीटरचे अंतर हा साधारणता १५ मिनिटात कापला जातो. मात्र ग्रीन कॉरिडोरमुळे चार मिनिट ३ सेकंद लागला. नांदेडमध्ये हे पाचवे ग्रीन कॉरिडोर आहे. २०१६ मध्ये पहिल्यांदा ग्रीन कॉरिडोर करण्यात आलं होतं. तेव्हापासून अवयव दानाला सुरुवात देखील झाली होती. अवयवदान हे श्रेष्ठदान असतं. त्यातच एका डॉक्टर मुलाने आपल्या वडिलाचे अवयव दानासाठी दाखवले समर्थता हे नक्की कौतुकास्पद आहे.

रुग्णाची किडनी आणि लिव्हर ‎घेऊन रविवार दुपारी साडेतीन‎ वाजता एअर ॲम्ब्युलन्स नांदेड ‎येथून उड्डाण घेऊन चिकलठाणा ‎विमानतळावर ४ वाजता उतरली.‎ रुग्णवाहिकेद्वारे कमलनयन बजाज‎ रुग्णालयात साडेचार वाजेपर्यंत‎ नेले. तेथे एका पुरूषाला किडनी‎आणि एका महिलेस लिव्हरचे‎ प्रत्यारोपण रात्री उशिरापर्यंत सुरू‎होते. अशी माहिती कमलनयन‎ बजाजचे वैद्यकीय संचालक डाॅ.‎मिलिंद वैष्णव यांनी दिली.‎

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!