नांदेड। पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत मोटार सायकल चोरीचे वाढते प्रमाणावर आळा घालण्याकरीता आरोपीतांची माहीती काढुन त्यांचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही करणे बाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांना आदेशीत केले होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांनी पोलीस स्टेशन भाग्यनगर हदीत मोटार सायकल चोरी करणारे आरोपीतांन विरुध्द कार्यवाही करणे बाबत पोलीस स्टेशन भाग्यनगर येथील गुन्हे शोध पथकास आदेश दिले होते.
दिनांक 10.12.2023 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. सुनिल भिसे, पोहेकॉ/709 दिलीप राठोड, पोहेकॉ/1098 गजानन किडे, पोकों/710 ओमप्रकाश कवडे असे कॅनलरोड, छत्रपतीचौक परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दोन इसम मोर चौक येथे संशयीतरित्या मोटार सायकलवर फिरत आहेत अशी माहीती मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार असे मौर चौक येथे गेले असता त्या ठिकाणी एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम.एच.26-बी.टी.-7004 असा असलेली दोन मुले संशयीत रित्या सार्वजनिक रोडवर वर थांबलेले दिसले. गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी सदर विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातील स्प्लेंडर मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत विचारपुस करता त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले. मालकी हक्का बाबत विचारपुस करता सदर मोटार सायकल बाबत समाधानकारक उत्तरे देत नसल्याने गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे घेवुन आले.
सदर विधीसंर्षग्रस्त बालकांना विश्वासामध्ये घेवून विचारपुस केली असता सदर बालकांनी एकुण 04 खालील प्रमाणेच्या मोटार सायकल दोन पंचासमक्ष जप्त केल्या आहेत. त्यामध्ये 1) पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.नं. 460/2023 कलम 379 भा.दं. वि. मधील चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटार सायकल किंमती 40000/-रुपये. 2) पोलीस स्टेशन वजीराबाद, नांदेड 452/2023 कलम 379 भा.दं. वि. मधील चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटार सायकल किंमती 30000/-रुपये.
3) पोलीस स्टेशन वाळुन एम.आय.डी.जी. औरंगाबाद येथील गु.र.नं.353/2023 कलम 379 भा.दं. वि. मधील चोरीस गेलेली युनिकॉन मोटार सायकल किमती 80000/-रुपये. 4) पोलीस शिवाजीनगर नांदेड भागातील विसावा उद्यानासमोरुन चोरलेली होडा शाईन मोटार सायकल किंमती 50000/-रुपये असा एकुण 200000/-रुपयाचा चोरीचा मुद्देमाल हा दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचे ताब्यातुन हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार साहेब, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री सुरज गुरव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, नांदेड शहर, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड, पो.उप.नि. सुनिल भिसे, पोहेकॉ/709 दिलीप राठोड, पोहेकों/1098 गजानन किडे, पोहेकॉ/2150 विशाल माळवे, पोहेकॉ/2252 विजय तोडसाम, पोकॉ/710 ओमप्रकाश कवडे पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर अधिकारी व अमंलदार यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.