उस्माननगरl घोडज ता . कंधार येथे राष्ट्रीय कृषि विकास बैंक(नाबार्ड) व संकृति संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या संयुक्त विद्यामानाने शेती दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र सगरोळी चे शास्त्रज्ञ डॉ. संतोष चव्हाण सर यांनी शेतकरी वर्गला – फळबाग लागवड, जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांची माहिती दिली.तसेक ढैंच्या लगावड करण्यासाठी प्रामुख्याने सांगीतले.
नवनवीन जातिनिहाय फलबाग लगवाड- आंबा, संत्र, मोसंबी, शेताच्या कडेने करवंद लागवड करणे या विषयी सविस्तर माहिती दिली .तसेच जमिनीचे आरोग्य तपासणी करणे व त्या नुसार पिकाला व फळबागाला खते देणे ईत्यादी विषयी डॉ. चव्हाण सराणी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले . हा कार्यक्रम प्रकल्प व्यवस्थापक श्री गंगाधर कानगुलवार सर यांच्या मार्गदर्शनाखली पार पाडला. कार्यकर्माचे सूत्र संचालन प्रदिपकुमार भिसे (कृषितज्ञ) यांनी केले.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद इरशाद सर , राजेश घोडजकर सर, व्यंकटी मिरकुटे व गावातील शेतकरी यांनी खुप परिश्रम घेतले. हा कार्यक्रमास विरपक्षि ऋषी महाराज पाणलोट समितीचे अध्यक्ष श्री. भगवान बाबा केंन्द्रे यांनी अध्यक्ष स्थान देण्यात आले होते तर तर प्रमुख उपस्थिती शिवाजी नामदेव घूगे ( डिरेक्टर ) जांबुळबेट ऍग्री फार्मर प्रोड्युसर कंपनी जांबूळवाडी यांना देण्यात आले. तसेच या कार्यक्रमास महीला बचत गटातील शेतकरी महिला उपस्थित होत्या .