करियरनांदेड

जलजीवन मिशनच्या जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा

नांदेड| जलजीवन मिशनच्या प्रचार प्रसिद्धीसाठी व विद्यार्थ्यांमध्ये पिण्याचे पाणी व जलसंवर्धन याविषयी जनजागृती हाण्‍यासाठी शालेय स्तरावर जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल देण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. पिण्याचे पाणी, पाणीपुरवठा योजनांमध्ये लोकसहभाग, पाणीपुरवठा योजना कार्यान्‍वीत झाल्यानंतर योजनेची देखभाल दुरुस्‍ती तसेच योजना शाश्वत राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली व स्त्रोत बळकटीकरणासाठी जलसंवर्धन याचे महत्त्व विद्यार्थीदशेपासूनच रुजावे व त्यांच्यात जनजागृती व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात आयोजित करण्यात आल्या आहेत. निबंध स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व माझ्या गावाचा विकास व जलसंवर्धन काळाची गरज हे विषय देण्यात आले आहेत. दोन्ही गटातील निबंधाची शब्द मर्यादा 1500 इतकी असून वेळ 40 मिनिटे राहणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणीपुरवठा, जलसंवर्धन व पाण्याचे महत्व, पाण्याचे वितरण व कर प्रणाली, पाणीपुरवठा योजनेतील लोकसहभाग व पाणीपुरवठा योजनेचे दुरुस्ती हे विषय राहणार आहेत.

शालेय स्तरावरून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थींचे तालुकास्‍तरावर स्‍पर्धा होतील. तालुकास्तरावर एक ते तीन क्रमांक निवडले जातील. त्‍यानंतर जिल्‍हास्‍तरावर स्‍पर्धा घेवून स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत. दोन्ही गटात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 21 हजार, 11 हजार व 5 हजार 500 रुपये रोख बक्षीस, सन्मानचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

तरी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी शालेय स्तरावरील निकाल 20 डिसेंबर 2023 पर्यंत गट विकास अधिकारी पंचायत समिती स्तरावर सादर करावेत तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!