हदगाव, शे चांदपाशा। दिपावळीत शेतक-याच बोनस ‘ म्हणून ‘सोयाबीन ‘कडे पाहीले जाते. त्या सोयाबीनचा ‘घात ‘येलो मोझँक ने केला असुन सुरुवातीलाच पावसाने दगा दिला नंतर त्याच्या लहरी पणामुळे रोगराईमुळे ‘सोयबीनचा दाना ‘ कमी झाला. यामुळे सोयाबीनचा उतारा कमी येत आहे.
यंदा हदगाव तालुक्यात 5 हजार हेक्टवर सोयाबीनचा पेरा आहे. एकरी 3 कि. पेक्षा कमी उतारा येत आहे. हदगाव तालुक्यात मनाठा निवघा आणि तामसा सर्कल मध्ये सोयबीन काढायला सुरुवात झालेली असुन, हदगाव शहराच्या भूसार मार्केट मध्ये नवीन सोयाबीन विक्रीसाठी आलेल आहे. नवीन सोयाबीनचे भाव 4 हजार असल्याची माहीती मिळाली. सोयाबीन पीकावर ‘येलोमँझिक ‘ (हळद्या रोग) आल्याने सुरुवातीला हिरवेगार दिसणारे पीक शेंगा लागल्यावर पिवळे पडून काळे पडत आहे.
परिणामस्वरुप सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट दिसुन येत आहे. तालुक्यात बहुसंख्य शेताच्या सोयाबीनवर येलो मँझिकचा रोगाचा प्रदुर्भाव झाल्याने ‘सोयाबीनच ‘च्या दाण्याचा आकार पण बारीक झाल्याने उत्पादनात घट पाहायावस मिळत आहे. यातच व्यापारी सुद्धा या बारिक सोयाबीनला भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्च म्हणजे खत बियाणे मजुरी सुद्धा निघणे कठीण होऊन बसलेले आहे. या ‘येलोमझँक ‘मुळे हदगाव तालुक्यातील शेतकरी खचलेला दिसुन येत आहे. या बाबतीत स्थानिय प्रशासनची या बाबतीत काहीच हलचल दिसुन येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
आमदार व खासदार यांनी सक्रिय व्हाव/ञस्त शेतकरी…!
हदगाव विधानसभाक्षेञा आ.माधवराव पाटील जवळगावकर व हिगोली लोकसभाचे खा. हेमत पाटील इतके नशीबवान आहेत. हदगाव तालुक्यातील ञस्त शेतकऱ्यांनी त्यांना कधी ही ञास न देता आपल्या ‘व्यथा ‘ जाहीररित्या कधी ही त्यांच्या समोर व्यक्त केलेल्या नाहीत. आता माञ ‘सोयबीन ‘उतारा प्रचंड प्रमाणात घटलेला आहे त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनासह आमदार व खासदाराकडे धाव घेत आहेत.
किमान हेक्टरी 50हजार व विमा 70ते 80 % मंजुर करावा अशी ञस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. विशेष म्हणजे विद्यमान खा. हेंमत पाटील यांनी 2019 मध्ये लोकसभाची निवडणूक होताच लगेच हदगाव व हि.नगर तालुक्यात स्वतंत्रपणे उपविभागीय आधिकारी व तहसिलदार संबंधित अधिका-याची बैठक घेवून तेव्हा शेतकऱ्यांना काही महीण्यातच शासनाचे अनुदान मंजुर करुन दिले होते. तेव्हा पासुन माञ आजपर्यत हदगाव तालुक्यात प्रशासकीय बैठक घेतल्याची माहीती मिळत नाही हे विशेष.