वाळकेवाडी येथे मंदिर कलशारोहण सोहळ्या निमित्त 108 कुंडाचा यज्ञ अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात
हिमायतनगर,शेख खय्यूम| श्री गुरु समर्थ रामबापू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वाळकेवाडी येथील मंदिर कलशारोहण सोहळ्या निमित्त 108 कुंडाचा यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह व यात्रा महोत्सव सोहळ्यास सुरूवात झाली सात दिवस चालणाऱ्या भक्तीमय सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती ह. भ. प. प्रकाश महाराज मेटकर व संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील श्री. गुरू समर्थ रामबापू मेटकर महाराज संस्थान वाळकेवाडी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंदिराचा कलशारोहण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 16 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह व यज्ञ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. 22 फेब्रुवारी रोजी यज्ञाची सांगता व कलशारोहण सोहळा होणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी दहीहंडी व काला प्रसाद होणार आहे.
या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम कलशारोहण सोहळ्यास परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, श्री. मृत्यूंजय भारती महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. सकाळी काकडा भजन हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, संत रामबापू चरित्र पारायण, हरिपाठ किर्तन, होणार आहे. किर्तनकार ह. भ. प. सिताराम महाराज,ह. भ. प. रंगराव महाराज, ह. भ. प. सिध्दांत महाराज,ह. भ. प. रामराव महाराज,ह. भ. प. रामदास महाराज,ह. भ. प. माधवराव महाराज, ह. भ. प. रामदास महाराज हे मंदिरातील किर्तनकार यज्ञ मंडपातील किर्तनकार ह. भ. प. कृष्णा महाराज बोंपीलवार,ह. भ. प. भिमराव महाराज फुटाणकर, ह. भ. प. गोकुदास महाराज, ह. भ. प. भास्कर महाराज,ह. भ. प. श्यामसुंदर गौरी महाराज,
ह. भ. प. माधव महाराज बोरगडीकर, ह. भ. प. अर्जुनराव महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. वडगाव येथील सात दिवस भजनी मंडळी साथ करणार आहेत. या मंदिर कलशारोहण सोहळ्या निमित्त 108 कुंडाचा यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह व यात्रा महोत्सव सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या संस्थानचे ह. भ. प. प्रकाश महाराज मेटकर यांनी केले आहे. या सप्ताहाचे व्यवस्थापन वाळकेवाडी, उखळवाडी, दुधड, रामनगर, वडाचीवाडी, बुरकुलवाडी, धनवेवाडी या गावच्या ग्रामस्थांकडून होत आहे.