श्रीक्ष्रेत्र माहूर, इलियास बावानी। श्री रेणुका माता गडाच्या पायथ्याशी असलेल्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोंथुला यांच्या अध्यक्षतेखाली,तर तहसिलदार मुंगाजी काकडे, सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, यांच्या उपस्थितीत दिनांक 4जुलै 2025रोजी स्थानिक विश्रामगृहात प्रशासनासोबत व्यापाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोंथुला यांनी गडाच्या पायथ्याशी असलेली दुकानांचे स्थलांतर करण्यासाठी प्रदिर्घ चर्चा केली असता व्यापारी बांधवांनी या बैठकीला प्रतिसाद दिला असुन, या प्रशनावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साडेतीन शक्तिपीठांपैकी मुळपीठ असलेल्या श्री रेणुका गडावर जाण्यासाठी 250ते तिनशे पायऱ्या चढून जावे लागते परंतु दिव्यांग,व वृद्ध भाविकांना दर्शनाविनाच दुःखी अंतःकरणाने परत जावे लागत होते हि बाब लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितिणजी गडकरीं यांनी लिफ्ट व स्कायवॉकच्या कामासाठी एक्कावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यासाठी अनेक परवानग्या प्राप्त करून घेतल्यानंतर नितिणजी गडकरीं यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली होती.

परंतु गडाच्या पायथ्याशी अंदाजे मागील पन्नास वर्षांपासून भाविकांची सर्वतोपरी सेवा करीत असलेल्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे सदरचे काम रखडले होते.या बाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मध्यस्थी केली होती परंतु बंदहुतांश व्यापाऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याने काम बंद पडते की काय परिस्थिती निर्माण झाली होती.परंतु प्रशासनातर्फे गडाच्या पायथ्याशी व्यापारी गाळे बांधुन देण्यात आले असून लवकरच त्या गाळ्यांमध्ये दुकाने स्थलांतरित करणे.

तसेच लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाचा मार्ग मोकळा होण्याच्या दृष्टीने सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोंथुला, यांनी तहसीलदार मुंगाजी काकडे,सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता भोकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदींप नाईक यांना सोबत घेऊन व्यापाऱ्यांसोबत यशस्वी चर्चा केली व्यापाऱ्यांनी या बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद दिला असुन या प्रशनावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोंथुला यांनी सांगितले यावेळी रवींद्र उमाळे आकाश राठोड तलाठी चंद्रकांत बाबर, व्यवस्थापक योगेश साबळे,श्री रेणुका माउली व्यापारी संघटनेने पदाधिकारी , कार्यकर्ते व्यापारी बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
