हदगाव, शेख चांदपाशा| नांदेड जिल्ह्यात हदगाव शहर अति संवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी नोंद आहे. हदगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून तीन वर्षे पूर्वी हदगाव शहरात अनेक मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्याच थेट कनेक्शन हदगाव पोलीस स्टेशनला जोडण्यात आले होते.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे शहरातील होणारे अवेधंद्यावर परिणाम झाला होता परंतु गौण खनिज चोरणाऱ्या गोंण खनिज माफियांची या सीसीटीव्हीमुळे फार गोची होती. या सीसीटीव्हीमुळे रेती माफिया माफिया यांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे हे सीसीटीव्ही बंद पडल्याचे चर्चा ऐकायावास मिळते याबाबत वर्षातून कधीतरी शांतता कमिटीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या नांदेड चे वरिष्ठ पोलीस अधिकारी ऐकण्यास वेळ देतात त्या वेळी ही बाब काही स्थानिक नागरिकांनी व पत्रकारांनी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस आणली असतात.

तेव्हा संबंधित पोलिसाच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बंद सीसीटीव्ही च्या बाबतीत प्रशासकीय पातळीवर काही करता येतील का? हे बघू म्हटले होते नंतर जवळपास शांतता कमिटीच्या या बैठकीला जवळपास आठ महिने झाले. तरी ते पोलीस वरिष्ठ अधिकारी हदगाव पोलीस स्टेशनला केव्हा येतात केव्हा जातात याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन प्रशासन देत नाही. शहरात सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविण्यात आले होते. तेव्हा कोणत्याही घटनेवर तात्काळ नियंत्रण मिळू लागले होते.

सीसीटीव्ही चालू करा नागरिकांची मागणी
हदगाव शहरात बंद पडले सीसीटीव्ही २४ चालू करावे या सीसीटीव्हीमुळे होणाऱ्या अप्रिय घटना समाज कंटकावर नजर ठेवता येते. सीसीटीव्ही चालू करण्यासंदर्भात लोकसभागातून प्रशासनाला आम्ही मदत करू शकतो असं काही नागरिकांनी म्हटलेले आहे. पण प्रशासनाकडून याबाबत कोणती हालचाल दिसून येत नाही.
