हंडरगुळी, उदगीर, लातूर, विठ्ठल पाटील| या वर्षी लातुर जिल्ह्यात अत्यअल्प पावसाळा झाला.त्यातच शासनाची कसलीच मदत नाही. तरी ही हिंम्मत न हारता वावरातील सगळी पिके तळहातावरच्या फोडा सारखी जपली. आणि त्यातील कापसाला ठिंबकने पाणी देऊन सव्वा एकरात खर्च वजा करता लातुर जिल्ह्यातील जळकोट तालुका मौजे.केकतसिंदगी येथील श्री.पंडीत दळवे यांनी 2,50,000 ₹. एवढा निव्वळ नफा मिळवला असुन,वरच्या निसर्गाच्या लहरीपणापुढे न हारता हिंम्मतीने कपाशीचे उत्पन्न घेतल्याने शेतकरी पंडीत दळवे यांचे जळकोट परिसरातुन कौतूक व अभिनंदन होत आहे.
दरम्यान “आले निसर्गाच्या मना तिथे कुणाचे चालेना” ही म्हन दळवे पंडीत या बहाद्दर शेतकरीराजाने खोटी केली असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. नांदेड येथून कपाशी- च्या 2 बॅगा खरेदी करुन शेतात 3×4 अंतरावर लावण केली.व 2ते3वेळा फवारणी करुन ठिंबकने पाणी दिलो. व एका ट्रीला 150ते200बोंडे लागली होती.आणि या पिकांना जिवापाड जपलो.आणि सव्वा एकरात अडीच लक्ष रु.निव्वळ उत्पन्न मिळाले.
अशी माहिती पंडीत दळवे, केकतसिंदगी या शेतकरी मामांनी आमच्या जवळ बोलताना दिली.व तसेच “राजा”चा “बळी”जाण्याची वाट न पाहता सर्वच “बळीराजा”ला सरसकट पिकविमा, अग्रीम आदी मदत शासना तर्फे द्यावी आणि “राजा” ने हतबल होऊन आपला “बळी” देऊ नये.उलट धैर्याने संकटाचा मुकाबला “बळीराजा”ने करावा.असे ही पंडीत दळवे आमचे जवळ बोलताना म्हणाले.कपाशीतुन चांगले उत्पन्न मिळाल्याने “पांढ-या सोन्याने पंडीत दळवेंना मिळवुन दिले पिवळे सोने”असे म्हणने चुक ठरणार नाही..