
नांदेड| दिनांक 19.11.2023 रोजी सायंकाळी 05.00 वा. चे सुमारास पोलीस स्टेशन भाग्यनगर परीसरातील डॉ. देशमुख यांच्या घराजवळ एका महीलेचे दोन अनोळखी मुले दुचाकीवर येवून जबरीने त्यांच्या गळयातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन काढुन घेवून फरार झाले यावरून पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे फिर्यादी नामे सुजाली गोवर्धन भट यांचे फिर्याद वरून दोन अनोळखी/अज्ञात इसमा विरुध्द गु.र.न. 444/2023 कलम 392,34 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयातील आरोपीतांचे व वाहनाचे वर्णन तसेच आरोपीचे सीसीटीवी फुटेज वरुन आरोपीचे शोध घेणेबाबत मा. वरिष्ठांचे आदेश झाले.
नांदेड शहरामध्ये जबरीने सोन्याच्या चैन स्नॅचींगचा प्रकार घडला असल्याने मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदड शहर यांनी सदरचे मोबाईल स्नॅचींग करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांना सुचना केल्या.
सदर सुचनांप्रमाणे पो. नि. अशोक घोरबांड यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज जमदडे सहा, पो. नि. पोहेकॉ दत्तराम जाधव, पोना/शरदचंद्र चावरे, पोकों/ बालाजी कदम, पोकों/ रमेश सुर्यवंशी, शेख ईग्रान, पोकॉ/भाऊसाहेब राठोड यांना घटना घडलेल्या परीसरातील सर्व सिसिटीव्ही फुटेज चेक करुन तसेच बातमीदार यांचेकडुन माहीती प्राप्त करुन आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व सोन्याची चैन जप्त करण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर आरोपीतांपैकी एक आरोपी शेख कलीम शेख शकील रा. खडकपूरा नांदेड व दुसरा आरोपी सय्यद जावेदोद्दीन उर्फ जावेद हा असुन ते सध्या खडकपूरा पाण्याचे टाकीखाली पिवळा पट्टा असलेल्या पॅशन मोटरसायकल सह असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर माहीतीवरुन आम्ही नमुद स्टाफसह 12.00 वाजता मिळालेल्या माहीतीच्या ठीकाणी छापा मारला असता
दोन ईसम मोटरसायकलसह मिळुन आले. त्यांना त्यांचे नांवगांव विचारणा करता त्यांनी आपले नांव 01. सय्यद जावेदोद्दीन उर्फ जावेद पिता सलीमोद्दीन, वय 44 वर्षे रा. उमर फारुखी मस्जीदजवळ लेबरकॉलनी नांदेड, 02. शेख कलीम शेख शकील, वय 22 वर्षे रा. खैरलुम ऊर्दू शाळेजवळ खडकपूरा नांदेड असे असल्याचे सांगितले. त्यांना विषयांकीत नमुद गुन्हयाबाबत विचारणा करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगुन गुन्हा करतांना हीच मोटरसायकल सोबत होती असे सांगितले. त्यावरुन जवळच असलेल्या दोन पंचासमक्ष त्यांचे ताब्यात मिळुन आलेली मोटरसायकल तसेच त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे सय्यद जावेदोद्दीन उर्फ जावेद पिता सलीमोद्दीन, वय 44 वर्षे रा. उमर फारुखी मस्जीदजवळ लेबरकॉलनी नांदेड यांचे उजव्या बाजुच्या पॅन्टच्या खिशामध्ये खालील वर्णनाची सोन्याच्या धातुसारखी असलेली चैन असे दोघांकडुन फिर्यादीचा बळजबरीने चोरी केलेली सौन्याची चैन व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 178,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर दोन्ही आरोपीतांचा पुर्व गुन्हे अभिलेख पडताळले असता आरोपी नामे सय्यद जावेदोद्दीन उर्फ जावेद पिता सलीमोद्दीन, याचेवर पो. स्टे शिवाजीनगर व भाग्यनगर येथे चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नामे शेख कलीम शेख शकील याचेवर पो.स्टे वजीराबाद येथे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतांना पुढील तपासकामी पो.स्टे भाग्यनगर यांच्याकडे देण्यात आले आहे. सदरचा गुन्हा 24 तासाचे आत उघडकीस आणलेबद्दल वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी वजीसबाद पोलीस नचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.
