नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये विकसीत भारत संकल्प यात्रा दिनांक 24.12.2023 ते 30.12.2023 दरम्यान सहा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विविध 13 ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती. सदर याचे दरम्यान केंद्र शासनांच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना व लाभार्थ्यांना देण्यात आली तसेच सदरील योजनांचा लार्भार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.
सदरील विकसीत भारत संकल्प यात्रेची सुरुवात नांदेड महानगरपालिका हद्दीत नमस्कार चौक येथुन दि 24.12.2023 रोजी सुरुवात करण्यात आली त्यानंतर सदरील यात्रा सर्व सहा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत केंद्र शासनांच्या विविध योजनांची माहिती देत दिनांक 30.12.2023 रोजी विकसीत भारत संकल्प यात्रेचा साईबाबा मंदीर, चैतन्य नगर (तरोडा बु) यास्थळी सांगता करण्यात आला. तद्नंतर सदरील विकसीत भारत संकल्प यात्रा ठरलेल्या नियोजनानुसार ता.अर्धापुर या ठिकाणास रवाना झाली.
विकसीत भारत संकल्प यात्रेची नांदेड महानगरपालिका हद्दीतील समारोप कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणुन मा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार, (नांदेड लोकसभा मतदारसंघ) यांची उपस्थिती होती. मा. अध्यक्षांनी कार्यक्रम प्रसंगी जमलेल्या सर्व नागरीकांना व लाभाथ्यर्थ्यांना प्रथम पंचप्राण शपथ देवुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. तसेच विकसीत भारत संकल्प यात्रेचे कॅलेंडर व योजनेची माहिती पुस्तीका कार्यक्रम प्रसंगी उपस्थीत असलेल्या नागरीकांना व लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यांनतर खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांनी उपस्थीत लाभार्थी यांना संबोधीत केले व नागरीकांना जास्तीत संख्येने यात्रेत सहभागी होवुन योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन केले.
सदरील विकसीत भारत संकल्प यात्रे प्रसंगी केंद्र शासनाचे विविध योजनांपैकी भारत कार्ड, मेडीकल चेकअप, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, मेडीकल चेकअप, आधार कार्ड अपडेट, पंतप्रधान आवास योजना व भारतीय डाक खात्याचा योजनांची माहिती देवुन सदरील योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. केंद्र शासनाचय योजनांपैकी एक असलेली मा. पंतप्रधान आवास योजनेमध्ये श्रीमती सुशिलाबाई हराळे यांनी घरकुल मिळाल्याने सदरील प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पिएम स्वनिधी अंतर्गत कर्जाचा लाभ मिळालेल्या लाभार्थी श्री भारत राठोड व सुंदसिंग चव्हाण यांचा सुध्दा मा. खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सदर विकसीत भारत यात्रेमध्ये मनपा क्षेत्रामध्ये दिं 24.12.2023 ते 30.12.2023 या कालावधील पिएम स्वनिधी योजनमध्ये 1315, मेडीकल चेकअप या योजनमध्ये 1855, आयुष्यमान कार्ड या योजनेमध्ये 2204 असे एकुण 5374 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. सदरील भारत विकास संकल्प यात्रा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मा. जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत, मा. आयुक्त श्री डॉ महेशकुमार डोईफोडे मा. अतिरिक्त आयुक्त श्री गिरीष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उप. आयुक्त तथा नोडल अधिकारी डॉ पंजाब खानसोळे, सह सहाय्यक नोडल अधिकारी तथा उप.अभियंता PMAY प्रकाश कांबळे यांनी यशस्वी नियोजन केले.
तसेच याकामी मा.उप.आयुक्त श्री निलेश सुंकेवार, मा.उप.आयुक्त श्री कारभारी दिवेकर, विभाग प्रमुख श्री संघरत्न सोनसळे मा. वैद्यकीय अधिकारी श्री सुरेश सिंह बिसेन, सर्व क्षेत्रीय अधिकारी श्रीमती निलावती डवरे, श्री मिर्झा फरहत बेग, श्री रमेश ज चवरे, श्री संजय जाधव, श्री रावण सोनसळे, श्री संभाजी कास्टेवाड यांनी यात्रेचे दिं 24.12.2023 ते 30.12.2023 या कालावधीत योग्य नियोजन व सहकार्य केल्याने यात्रेची यशस्वी सांगता झाली.