धर्म-अध्यात्मनांदेड

हिमायतनगरात विजयदशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

हिमायतनगर,परमेश्वर काळे| विजयादशमी, धम्मचक्र प्रर्वतन दिनानिमित्त हिमायतनगर शहरात मीरवणुकीसह, रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरासह ग्रामीण भागात दसरा सन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सोन्याचे महत्व असलेल्या नागरिकांनी दुकानातून सोने खरेदी केली. तर त्याचे प्रतिक मानले जाणाऱ्या अपट्याचे पाने एकमेकांना देवून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. बौद्ध अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढून अभिवादन केले.

हिमायतनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे पारंपारीक पध्दतीने सोने लुटण्यासाठी येथील कालिंका मंदिरापासून ढोल – ताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात गावातील प्रमुख लोकांनी सहभाग घेऊन सोने लुटले. त्यानंतर शहरातील सर्व देवी – देवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांनी एकमेंकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शहरातील कालिंका माता, बालाजी मंदिर, परमेश्वर मंदिरासह सर्वच मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यानंतर रात्री ९ वाजता विश्वहिंदू परिषद व बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत ३० फुट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी रंगी बेरंगी फटाक्यांची आतिषबाजी पाहून नागरिकांचे डोळे दिपून गेले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयजयकाराणे परिसर दणाणला

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथील आंबेडकर चौकात असलेल्या बुध्दविहारांमध्ये अनेक उपासक-उपासिकांनी त्रिशरन पंचशिल गृहन करुन ध्वाजारोहन केल. तसेच लहान बालकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्यानंतर एक दुसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभकामना दिल्या. दुपारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील मुख्य रस्त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात बालक, युवक, युवतीं व जेष्ठ नागरिकानी सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. मिरवणूक शहरातील प्रमुख चौकात येताच या ठिकाणी विविध मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पिशफार अर्पण करून अभिवादन केले. काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत युवकांनी ठेका धरून जल्लोषपूर्ण वातावरणात एकच साहेब डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयजयकाराणे परिसर दणाणला होता. एकूणच विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!